बीड

जागतिक पर्यावरण दिन: भाजयुमोतर्फे शिरपुऱ्यात ‘आंबा-नारळ’ वृक्षारोपण उपक्रम संपन्न!

​  जागतिक पर्यावरण दिन: भाजयुमोतर्फे शिरपुऱ्यात ‘आंबा-नारळ’ वृक्षारोपण उपक्रम संपन्न!
​ केज  प्रतिनिधी .
​  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात मंडळ निहाय किमान ५०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. लोकनेत्या पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा यांच्या आवाहनानुसार आणि भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजयभाऊ आंधळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.
​याच संकल्पाचा भाग म्हणून, येवता जिल्हा परिषद गटातील शिरपुरा (ता. केज) येथील पवित्र दौलत बाबा मठ परिसर आणि गावात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजयुमोचे सुरज भैया घुले यांच्या विशेष पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि संगोपनाचा निश्चय
या मोहिमेअंतर्गत मठ परिसर व गावात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंब्याची व नारळाची रोपटी लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. केवळ झाडे न लावता, त्यांचे पुढील काळात जबाबदारीने संगोपन करण्याचा निश्चयही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला.
​या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी शिरपुरा गावातील आदरणीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवा मोर्चाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या पिढीला हिरवेगार भविष्य देण्बयासाठी भाजयुमो सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी संयोजकांनी व्यक्त केला.
Back to top button