राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने लक्ष्मीताई पवार सन्मानित

राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने लक्ष्मीताई पवार सन्मानित
जनविकास सेवाभावी संस्थेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल
जामखेड : जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांना सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
बी दि चेंज फाउंडेशन, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दि.१७ मे २०२६ रोजी शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाला.
साई पॅलेस निवारा, साईबाबा मंदिर परिसर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सूभेदार मेजर (निवृत्त) संजय कुमार, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, अरुण भंडारे (निवृत्त), अभिनेत्री निवेदिता पगार, आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार कैलास गडाख, उद्योजक संजय वाबळे, महसूल सल्लागार सुरेश घोडके तसेच बी दि चेंज फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिषेक तुपे,प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट शुभांगी थोरात, संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना कसारे आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मीताई पवार यांनी जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, महिला सक्षमीकरण व जनजागृती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पवार यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जामखेड शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



