बीड

प्रपंचाला दिशा देणारी रामकथा आहे- संजय महाराज पाचपोर.

प्रपंचाला दिशा देणारी रामकथा आहे- संजय महाराज पाचपोर.
रामायणाचा विचार केला तर आपल्या घराचे महाभारत होणार नाही – रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर.
पुण्यतिथी उत्सवात तिसऱ्या दिवसाचे कथा पुष्प..
बीड – दि- २७ (प्रतिनिधी) प्रपंचाला दिशा देणारी राम कथा आहे.प्रपंचात कुटुंबात समन्वय कसा असावा याचा उत्तम आदर्श रामायणात आहेत. यशस्वी प्रपंचामध्ये समन्वय महत्वाचा असतो.
रामायणाचा विचार केला तर आपल्या घराचे महाभारत होणार नाही. असे प्रतिपादन श्री ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले. श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत बंकट स्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी उत्सवात दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचे कथा पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख,महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री ह भ प, प्रकाश महाराज साठे,श्री ह भ प नाना महाराज कदम श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, अन्नदान कमिटी विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे सुरू असलेल्या भव्य पुण्यतिथी सोहळ्यामध्ये तिसऱ्या दिवसाचे कथा पुष्प गुंफताना रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर म्हणाले की.प्रसंग कोणताही असला तरी धर्म सोडला नाही पाहिजे.हे रामकथा सांगतोय. त्यामुळे रामकथा कधीच जुनी होवू शकत नाही.. गंगेचा प्रवाह जसा जुना होत नाही.सूर्यालाचा प्रकाश आणि आकाशाला जुने झाले अस म्हणता येत नाही. वारकरी धर्मा सारखा सर्वांना सामावून घेणारा दुसरा कोणताच धर्म नाही. सर्व समावेशक तत्वज्ञान वारकरी संप्रदायात आहे राम कथा सोन्याच्या जवळ अर्थात श्रीमंतीच्या बाजूने संस्कृती ठेवा अस सांगते जर सोन्याच्या बाजूला संस्कार नसतील तर एक दिवस ते सोने साप बनल्याशिवाय राहणार नाही. अस महाराज म्हणाले.
कथेमध्ये शिव आणि पार्वती विवाहाची कथा सांगताना. बापाचे मुलीवर किती प्रेम असते.विवाह प्रसंगात कितीही कठोर असलेला बाप मात्र डोळ्यातील अश्रू रोखू शकत नाही. तर आई वडिलांच्या वृद्धापकाळात मुलगीच आधार बनलेली असते. स्वतः कष्ट सहन करते पण आपल्या बापाच्या बद्दल वाकडा शब्द सहन करू शकत नाही. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. मुलीला शिक्षण दिले पाहिजे अस महाराज म्हणाले.
आशीर्वाद आणि शाप साधूने दिला पाहिजे. साधूच्या आशीर्वादाने कल्याण होते. असेही महाराज म्हणाले.कथेला साथ संगत मुख्य गायक विवेकजी महाराज गावंडे, सुरेल बासुरी वादक अभिनय महाराज,कृष्णा महाराज, तबला वादक अक्षय महाराज मोरे यांची लाभली.
Back to top button