अँड अरुण जाधव राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली

अँड अरुण जाधव राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; विचारमंथनाची हाक
जामखेड (प्रतिनिधी) –
वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने जामखेड येथे ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन व विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नव्या पिढीला चिकित्सक दृष्टीकोन देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व नागरिक सहभागी होणार असून पुस्तकातील विचारांवर मुक्त चर्चा देखील होणार आहे.
आयोजकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करताना विविध दृष्टीकोनातून इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या पुस्तकाच्या माध्यमातून संवाद आणि चिंतन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अरुण आबा जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामुळे जामखेड परिसरात बौद्धिक चर्चेला चालना मिळणार असून युवकांमध्ये इतिहासाबाबत जिज्ञासा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



