संभाजी ब्रिगेड जामखेड यांची पाणपोई ही पुण्यकर्म नाही तर आरोग्य सुविधा आहे – अण्णासाहेब सावंत प्रदेश उपाध्यक्ष

संभाजी ब्रिगेड जामखेड यांची पाणपोई ही पुण्यकर्म नाही तर आरोग्य सुविधा आहे – अण्णासाहेब सावंत प्रदेश उपाध्यक्ष
जामखेड प्रतिनिधी – आज १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त जामखेड येथील तहसील कार्यालया समोर संभाजी ब्रिगेड जामखेड व महात्मा जोतीराव फुले विचार मंच यांच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली. तालुक्यातून अनेक लोकं शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात मात्र तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची कुचंबना होते. उन्हाचा पारा ४० पार झाला आहे.
अशा वेळी स्वच्छ व थंड पाणी पिणे शरीरासाठी आरोग्यदायी व फायदेशीर ठरते हे लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेड जामखेड व महात्मा जोतीराव फुले विचार मंच यांनी पाणपोई सुरू केली आहे. या पणपोई चे उद्घाटन विद्यमान नगरसेवक अँड अरुण जाधव , संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत , शिवसेना ( युवा) तालुका अध्यक्ष प्रविण बोलभाट , ओबीसी सेल अध्यक्ष श्री विष्णुपंत गंभीरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष प्रा. शशिकांत कान्हेरे, जामखेड संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजू काटकर , सामाजिक कार्यकर्ते बिलाल शेख, वाल्मिक रेडे , सुमंत रेडे , भारत रेडे , अक्षय पोकळे , संभाजी जाधव व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी नगरसेवक अँड अरुण जाधव व अण्णासाहेब सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड सामाजिक परिवर्तन चळवळीत नेहमीच अग्रभागी असते असे उद्गार ॲड.डाॅ. अरुण जाधव यांनी काढले तर संभाजी ब्रिगेड ची पाणपोई ही पुण्यकर्म नसून आरोग्य सुविधा आहे असे मत प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी मांडले.



