बीड

बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात भगव वादळ निर्माण होणार शिवसैनिकांनो सज्ज रहा :बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोजजी शिंदे

बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात भगव वादळ निर्माण होणार शिवसैनिकांनो सज्ज रहा :बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. मनोजजी शिंदे
*बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री मनोजजी शिंदे साहेब, मराठवाडा सचिव श्री. अशोक पटवर्धन, बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत आप्पा नवले यांच्या हस्ते गेवराई मध्ये शिवसेना तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन* व शाखा ऊध्दघाटन सोहळा संपन्न
गेवराई  (प्रतिनिधी) शिवसैनिकांच्या जोरावर गेवराईसह जिल्ह्यात भगवा अधिक उंचावणार असून प्रत्येक गावात शिवसेनेचे मजबूत जाळे उभे करु. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसैनिकांचे संघटन अधिक मजबुत करणार आहे. शिवसैनिकांनी जनतेच्या प्रश्नावर तत्परतेने काम करुन शिवसेनेची ओळख अधिक मजबुत करावी, असे प्रतिपादन बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांनी केले. तर शिवसेना हा केवळ पक्ष  नसून जनतेशी जोडलेली चळवळ असल्याचे प्रतिपादन मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी केले.
गेवराई मध्ये श्री . मुकेश आण्णा महाजन यांच्या शिवसेना तालुका संपर्क मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन व गेवराई शहरांमध्ये शाखा ऊध्दघाटन सोहळा संपन्न झाला
गेवराई  या ऊध्दघाटन सोहळा प्रसंगी बीड संपर्कप्रमुख मनोजजी शिंदे साहेब ,  मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत आप्पा नवले शिवसेन जिल्हाप्रमुुख सचिन मुळूक,  मराठवाडा निरीक्षक युवासेना श्री.  अविनाश जाधव,   बीड जिल्हा शिवसेनासंघटक श्री.  विक्रमराजे भोसले,   युवासेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे ,  युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सुमीत कोळपे,  गेवराई शहर प्रमुख मुकेश महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख श्री ऊध्दव मडके, युवासेना तालुकाप्रमुख बिभिषण आप्पा मोघे,  , युवासेना विधानसभा प्रमुख ऊमेश शिंदे, शिवसेना वि.अध्यक्ष नवनाथ गवते, ओबीसी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बाळासाहेब खेडकर, युवा सेना शहर प्रमुख गणेशराव पवार, शिवराज ऊगले, शिवसेना नेते प्रदोष जाधव, यांच्या सह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमात मनोज शिंदे यांनी म्हणाले की,  बीड जिल्हा हा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून येथे संघटन अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावणे गरजेचे आहे. गावागावांत शाखा बळकट करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवला जाईल यासाठी शिवसैनिकांनी काम करावे. आगामी काळात शिवसैनिकांच्या बळावरच मोठे यश मिळवू असे आवाहन शिंदे यांनी केले.    शिवसेना मुख्य नेते तथा  उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब, संसदरत्न डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड श्री. चंद्रकांत आप्पा नवले यांच्या नेतृत्वाखाली
गेवराई तालुक्यातील प्रत्येक बुथ वर, प्रत्येक गावात बुथनिहाय  B L A नेमणूक करण्यात यावी,  त्यासाठी नेमणूक केलेल्या B L A  आवश्यक मतदार यादीतील नाव असावे सोबत मोबाईल नंबर गावचे व बुथ प्रमुखाचे नांव जमा करावे, व तुम्हाला  B L A  गावनिहाय बुथवर B L A  नेमणूक करून B L A ची यादी मतदान यादीतील नाव अनुक्रमांक   यादीसहीत अहवाल पक्षाकडे सादर करा,
मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनतेच्या भावना आणि प्रश्नांशी जोडलेली चळवळ असल्याचे सांगितले. संघटन वाढीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
Back to top button