बीड
बाळराजे पवारांच्या वतीने आयोजित दावत ए इफ्तार कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळराजे पवारांच्या वतीने आयोजित दावत ए इफ्तार कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
गेवराई दि. 8 : (प्रतिनिधी) : भाजपाचे नेते बाळराजे पवार यांच्या परिवाराच्या वतीने रविवार ता. 8 मार्च रोजी भगवती टाॅकिज परिसरात आयोजित आलेल्या, दावत ए इफ्तार कार्यक्रमास मुस्लिम – हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेवराई चे पाटील बाळराजे पवार यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी इफ्तार ए दावत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. रविवार ता. 8 मार्च 2026 रोजी शहरात भगवती चित्रपट गृहाच्या परिसरात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, पवार परिवाराच्या वतीने बाळराजे पवार , शिवराज पवार यांच्यासह ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर, ॲड. भगवान घुंबार्डे, जगदीश पवार, शोयब आत्तार, नगरसेवक बद्दुशेठ, शहेदाद भाई, शफी आत्तार, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, माजी उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, भरत गायकवाड, युसूफ भाई, युनुस जमादार, माऊली वादे, विठ्ठल मोटे, कृष्णा पाटोळे, नोमान फारोखी, याहयां पठाण, फिरोज अहमद, करण जाधव, रामनाथ दाभाडे, ब्रम्हदेव धुरंधरे, बेदरे शिनुभाऊ, बाळासाहेब सानप, राजाभाऊ आर्दड, नासेर भाई आत्तार, हामजा आत्तार, एजाज मेंबर, ॲड. अब्बास भाई, इनूस भाई, किशोर धोंडलकर , अशोक चव्हाण, सादेक चाचू , वाजेद चौधरी
सर्व नगरसेवक, माऊली सुतार,शेख अरबाज, लुकमान खान, सय्यद इम्रान, अमीर रजा, सय्यद मुद्दशीर, आखेप काझी, सलमान आत्तार यांनी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.



