बीड

यशस्वी आणि गुणवंतांना सोशल मीडियावर फॉलो करा – रणवीर पंडित

यशस्वी आणि गुणवंतांना सोशल मीडियावर फॉलो करा – रणवीर पंडित
जयभवानी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गेवराई दि.२६ (प्रतिनिधी) आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य विरांनी इतिहास घडवला तो आपण कधीच विसरुन नये. देशहितासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेतील अधिकारा बरोबरच कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सोशल मिडियाच्या या काळात आपण चांगल्या व्यक्तींचे अनुकरण करावे, विविध क्षेत्रातील यशस्वी आणि गुणवंतांनाच आपण फॉलो करावे असे आवाहन शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. जयभवानी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गढी येथील जयभवानी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात  ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, सामाजिक कार्यकर्ते शाहिण पठाण, माजी सरपंच गणेश सावंत, रविंद्र चोरमले, रमेश नेहरकर, चेअरमन रामेश्वर गरड, दिंगाबर चौधरी, धर्मराज कदम, किशोर ढोले, धर्मराज कदम, नितीन शिंदे केंद्रप्रमुख. लोणकर आण्णासाहेब, प्राचार्य व्हि.पी. राठोड, प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे, पर्यवेक्षक रणजीत बडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रणवीर पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संगीत विभागाचे राजेंद्र काळे आणि त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी स्वागत गित आणि देशभक्तीपर गिते सादर केली. याप्रसंगी प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी
सामुहिक कवायत सादर केली तसेच उल्हास भारत अंतर्गत विद्यार्थ्यांनी साक्षरतेची सामुहिक प्रतिज्ञा घेतली.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी विविध देशभक्तीपर गितावर विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड यांनी केले. सुत्रसंचलन रणजित बडे यांनी तर ध्वज संचलन लक्ष्मण डोंगरे व दिलीप धस यांनी केले. यावेळी विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संखेने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button