ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी :
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी या प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक अनिल देडे यांच्यासह नगरसेविका सिमा रविंद्र कुलकर्णी, संगीता रामचंद्र भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांना पर्यावरण विषयक कविता भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच महिलांसाठी खास संगीत खुर्ची हा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उच्च माध्यमिक विद्यालयातील खके जयश्री, डूचे वंदना, होमकर सुरेखा, पोकळे प्रमिला, साबळे स्वाती, भोईटे योगिता, पानसरे ऐश्वर्या तसेच माध्यमिक विद्यालयातील संगीता दराडे, वंदना अल्हाट, सुप्रिया घायतडक, पूजा भालेराव, स्वाती बांगर, स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रभा रासकर, सुरेखा धुमाळ, प्रियांका सुपेकर, शितल जगदाळे आदी शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.



