बीड
दक्षता व तत्परता: परळीची मुख्य जलवाहिनी रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामामुळे होणार होती बाधित ; बाजीराव धर्माधिकारी यांनी योग्य समन्वय साधून काढला मार्ग !

दक्षता व तत्परता: परळीची मुख्य जलवाहिनी रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामामुळे होणार होती बाधित ; बाजीराव धर्माधिकारी यांनी योग्य समन्वय साधून काढला मार्ग !
_शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक अडचण येण्यापूर्वीच सोडवला प्रश्न_
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
भारतीय मध्य रेल्वेच्या परळी ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. टोकवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामामुळे नागापूर ते परळी शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी प्रक्रिया व शुद्धीकरण केंद्राची (WTP) मुख्य जलवाहिनी बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक अडचण आली असती. परंतु वेळीच घेतलेली दक्षता व तत्परता यामुळे अडचणीपूर्वीच हा प्रश्न सोडविण्यात आला आहे.
टोकवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामामुळे नागापूर ते परळी शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी प्रक्रिया व शुद्धीकरण केंद्राची (WTP) मुख्य जलवाहिनी येते. ही मुख्य जलवाहिनी असल्याने ती बाधित झाली तर काही दिवसांसाठी तांत्रिक कारणास्तव व पर्यायी व्यवस्था करेपर्यंत पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला असता. मात्र याची वेळीच दक्षता घेत व अतिशय तत्परता दाखवून नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी यात गांभीर्याने लक्ष घातले. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी याबाबत स्थळपहाणी केली.रेल्वे आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय घडवून आणत बाधित होत असलेली मुख्य जलवाहिनी वाचवली आणि योग्य मार्ग काढून हा प्रश्न तयार होणे आधीच सोडवला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे अभियंते व परळी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत संयुक्तपणे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी स्थळपहाणी करून रेल्वे प्रशासनाकडे मुख्य जलवाहिनीस कोणतीही मोडतोड न करता काम करण्याची विनंती केली होती.
नगरपालिकेच्या या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने सहकार्याची सकारात्मक भूमिका घेतली. मुख्य जलवाहिनी सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र पर्यायी वळणमार्ग (डायव्हर्जन) करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम न होता रेल्वे ओव्हरब्रिजचे काम वेगाने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे प्रशासनाने सहकार्य करुन आवश्यक उपाययोजना केल्यामुळे परळी शहरवासीयांना पाणीपुरवठा खंडित होण्यापासून मोठा दिलासा मिळाला असून नगर परिषदेकडून मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.



