बीड

बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत  : शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांचा प्रेरणादायी उपक्रम”

बाळासाहेबांच्या विचारांची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत  : शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांचा प्रेरणादायी उपक्रम”
“नव्या पिढीला बाळासाहेबांचे विचार : उद्धव बापू मडके यांच्या पुढाकाराने विचार प्रबोधन स्पर्धेचे आयोजन”
 गेवराई (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या शताब्दी जयंतीनिमित्त “बाळासाहेब ठाकरे विचार प्रबोधन स्पर्धा”23 जानेवारी 2026 पासून   आयोजित करण्यास  आली आहे. ही स्पर्धा शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे.
“बाळासाहेब शताब्दी सेवा सप्ताह” या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी (प्रायव्हेट) शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, समाज जाणीव, नेतृत्वगुण व प्रेरणादायी विचार रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही स्पर्धा पूर्णतः शैक्षणिक व सामाजिक हेतूने आयोजित करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार नसणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक व बौद्धिक विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी पंचायत समिती गेवराईचे गटशिक्षणाधिकारी व संबंधित सर्व शाळांना लवकरच अधिकृत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना वैचारिक प्रबोधनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Back to top button