बीड

ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या मेळाव्यास उपस्थित रहा -भाऊराव प्रभाळे 

ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या मेळाव्यास उपस्थित रहा -भाऊराव प्रभाळे
बीड (प्रतिनिधी) दिनांक 11 जानेवारी रोजी बीड जिल्हा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने विजय लॉन्स नगर रोड  तळेगाव येथे भव्य जिल्हा व्यापी मेळाव्याची आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा संघटनेच मागील अनेक दिवसापासून प्रलंबित अधिवेशन घेण्यात आलेले नव्हते त्यामुळे भविष्यातील आव्हाने आणि परिस्थिती लक्षात घेता अधिवेशन घेण्यात येणार आहे.
ग्रामीण जनतेच्या व शेतमजूर, शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी राबवली जाणारी योजना बदलत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणामुळे या योजनेत होणारी गुत्तेदारी त्यामुळे ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या रोजगार सहायकांच्या वाढत्या समस्या व धोक्यात असलेले ग्रामरोजगार सेवक पद या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर लढाई उभ्या करण्यासाठी जिल्हा संघटना मजबूत असावी म्हणून हे अधिवेशन होत आहे. मजूर केंद्रीय योजना स्थानिक राजकारणामुळे गुत्तेदारीच्या विळख्यात सापडल्याने बदनाम करून बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडणे गरजेचे आहे. नुकतेच केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चे नाव बदलून विकसित भारत जी रामजी असे केले आहे खरंतर नाव बदलण्यापेक्षा अंमलबजावणीत सुधारणा आवश्यक होत्या परंतु तसे न करता नाव बदलल्याने सुधरेल असे केंद्रीय मंत्री पटवून देत आहेत. अगोदर मागेल त्याला काम होते आता गरजेनुसार काम असे धोरण विकसित भारत जी रामजी मध्ये आहे.
3 ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ग्राम रोजगार सेवकांना फिक्स मानधन ८००० रु अधिक भत्ता देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पारित केलेला शासन निर्णय आजपर्यंत अमोल बजावणी आणलेला नाही. बोगस ग्रामसभा घेऊन आपल्या सोयीनुसार गैरकामे करणारे अतिरिक्त रोजगार सहाय्यक एक वर्षासाठी नियुक्त केले होते परंतु मुदत संपूनही आजपर्यंत कार्यमुक्त केले नाहीत.
अर्धवेळ रोजगार सहाय्यकाकडून पूर्ण वेळ काम करून घेतले जाते व मानधन वेळेत तर सोडूनच द्या वर्ष वर्ष मिळत नाही याला संघटना म्हणून कमी पडत असल्याचे लक्षात आल्याने भक्कम संघटना करण्यासाठी अधिवेशन घेत आहोत. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष भाऊराव प्रभाळे, सिद्धेश्वर खांडे,एकनाथ गर्जे, अंगद खवतड, सोपान होळंबे, शहादेव शेजुळ, पोपट राख, दीपक महागोविंद, मते, विष्णू कुराडे, मोहन कचरे, शिवाजी मुंडे, विलास गवळी, अनिल घोडके, वसीम बेग आदींनी केले आहे.
Back to top button