📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रिपाइंच्या वतीने गोरगरिबांना सणासुदीच्या काळात मदतीचा हात

रिपाइंच्या वतीने गोरगरिबांना सणासुदीच्या काळात मदतीचा हात
पप्पू कागदे यांच्या हस्ते गोरगरिबांना किराणा किटचे वाटप
बीड प्रतिनिधी
दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व मोलमजुरी करून उपजीविका भागविणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुष्काळाची वेळ जात, धर्म पाहून येत नाही. त्यामुळे रिपाइंकडून आलेली मदत कोणत्याही एका समाजापूर्ती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. सणासुदीच्या काळात दुष्काळाची झळ सोसणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी आज रोजी पालवन वस्ती, बीड येथे रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या हस्ते गोरगरिबांना किराणा सामान किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पप्पू कागदे म्हणाले की, रिपाइंच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एम.एस नंदा यांनी राज्यभरातील दुष्काळग्रस्तांना शंभर ट्रक धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्याची घोषणा राज्यात प्रथम केली होती. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यासाठी 1600 किराणा सामान किट पाठविण्यात आल्या आहेत. बीड जिल्हा यंदा गंभीर दुष्काळाचा सामना करीत आहे. शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात गरजू व गरीब कुटुंबीयांना किराणा साहित्याची मदत मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे.  बीड जिल्ह्यासाठी पाठवण्यात आलेल्या किराणा सामान किटचे जिल्हाभरातील विविध भागांमध्ये वाटप करण्यात येत आहे. आगामी काळात सेवाभावी संस्था, मंदिराच्या ट्रस्ट, उद्योगपती यांनी दुष्काळग्रस्त गोरगरिबांना मदत करावी असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी याप्रसंगी केले.
राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्तांना 5 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.  ही मदत फार तोकडी असून रिपाइंच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. शेतमजूर, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबीयांना तात्काळ 50 हजार रुपये मदत देण्यात यावी. अशी मागणी करण्यात येणार आहे. यावेळी सुभाष मस्के, राजू जोगदंड, किसन तांगडे,किशोर कांडेकर, शाहू डोळस, प्रभाकर चांदणे, श्याम वीर, भैय्यासाहेब साळवे,धम्मा पारवेकर,महेश कागदे, भास्कर जावळे,कृष्णा साबळे,आकाश साबळे, मनोज भडगळे, राजू अहिरे, अनुरथ मस्के, संतोष मस्के, अमोल लोखंडे, दीपक साबळे, वैभव मस्के, बाळू साबळे, यांच्यासह शेकडो महिला, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.
Back to top button