बीड

लक्ष्मीच्या पावलांनी झाला शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाचा शुभारंभ

लक्ष्मीच्या पावलांनी झाला शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाचा शुभारंभ
==============
जयसिंग पंडित यांनी जाहिर केली नवजात कन्येच्या नावे ५ हजारांची ठेव
==============
गेवराई दि.१( प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गेवराई येथे प्रसुती विभाग आणि आरोग्यसेवेचा शुभारंभ एका गोंडस कन्यारत्नाच्या जन्माने झाला. हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात जन्मलेल्या या पहिल्या बालिकेच्या आगमनाने रुग्णालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून “लक्ष्मीच्या पावलांनी प्रसूती विभागाचा शुभारंभ झाला” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित यांनी बालिकेच्या नावे ५ हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट ठेव जाहीर केली तसेच माता व बालिकेचा साडी, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

पाचेगाव येथील भाविका अनिकेत वाघमारे यांनी शारदा हॉस्पिटल आयोजित आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून नोंदणी केली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली व माता-बालक दोघेही सुखरूप आहेत.
नवजात बालिकेचे स्वागत करताना जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित यांनी बालिकेच्या नावे ५ हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट ठेव जाहीर केली तसेच माता व बालिकेचा साडी, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणाऱ्या शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रवासाची सुरुवातच कन्यारत्नाच्या आगमनाने झाल्याने हा क्षण रुग्णालयासाठी संस्मरणीय ठरला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्यातून अनेक नागरिकांना लाभ मिळत आहे.

यावेळी गेवराई नगर परिषदेचे माजी नगरसेवक हावेज शेख, भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक बंडूनाना मोठे, प्रा. बबन काकडे, श्रीराम शेळके, रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. अजयसिंह पंडित,
डॉ.सौ. धनश्री पंडित, डॉ. फिरोज शेख, डॉ. प्रफुल्ल गव्हाणे, डॉ. किरण जाधव, डॉ. आदित्य जरांगे, डॉ. आव्हाने, डॉ. उल्फत परदेशी, डॉ. काळे, डॉ. ढोरे, डॉ. लोंढे, डॉ. गिरे, डॉ. शेख हबीब, डॉ. सावंत, डॉ. टाक यांच्यासह जनसंपर्क विभागाचे तात्यासाहेब भोसले, नर्सिंग विभागातील सौ. माळवे, सौ. पवार तसेच फार्मसी विभागाचे आनंद भगत, शिवम पाटोळे, राठोड, बोर्डे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button