📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दलित कुटूंबाला धमकी देतांनाची वाल्मीक कराडची क्‍लिप व्हायरल

दलित कुटूंबाला धमकी देतांनाची वाल्मीक कराडची क्‍लिप व्हायरल
वाल्मीक कराडचा जुना सहकारी बाळा बांगरचे खबळबळजनक खुलासे
पाटोदा, पुढारी वृत्तसेवा ः वाल्मीक कराडचे अनेक काळे कारनामे माझ्याकडे आहेत. टप्प्या टप्प्याने मी ते समोर आणणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाची माहिती वाल्मीक कराडला साडेपाच वाजताच होती, त्याने मला तसा फ ोनही केला होता. तसेच एका दलित कुटूंबला देखील धमकी देतानाची क्‍लिप बाळा बांगर यांनी समोर आणली असून यामध्ये वाल्मीक कराड आता सगळ्यांनाच मध्ये घेतो… तु कोण रे कुत्रा? अशा शब्दात धमकी देत असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले.
वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी पाटोदा येथे बुधवारी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासे केले आहेत. यामध्ये  एका व्यक्तीने कामासाठी वाल्मीक कराडला लाखो रुपये दिले होते. मात्र ते वाल्मीक कराड परत देत नसल्याने तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मीक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली. याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणली.  हा धक्कादायक प्रकार आहे या संदर्भात मी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून ही कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले आहे.
एवढेच नाही तर माझ्यासह माझ्या कुटुंबाला फार त्रास दिला. माझ्या आईला बीड पोलिसांनी पहाटे अटक केली. रुग्णालयात असताना तिला अंबाजोगाईला रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली होती. अतिशय कठीण प्रसंगातून माझ्यासह अनेक कुटुंब गेले आहेत. हळूहळू मी त्याच्या संदर्भातचे खुलासे करणार असल्याचे देखील बाळा बांगर यांनी म्हटले आहे..
दिल्लीत असताना मला त्या ठिकाणी 9 डिसेंबर 2024 ला काही व्यक्ती भेटले त्यांनी मला फोन लावून दिला त्यावर वाल्मीक कराड बोलत होता त्यावेळेस त्याने काय नेते. काय युवराज, तुमचाच एक मित्र सरपंच परिषद खल्लास असे म्हणाला. वाल्मीक कराड याला साडेपाच वाजताच सरपंच देशमुख यांची हत्या झाली? हे कसे काय माहिती होते? असा प्रश्न देखील बाळा बांगर यांनी म्हटले आहे. तसेच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील वाल्मीक कराडचाच हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.
याबरोबरच धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांचा देखील काटा काढायचा असल्याचे वाल्मीक कराड याने मला सांगितल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले. तसेच माझ्याशी झालेल्या वादानंतर वाल्मीक कराड याने मला मुंबईला बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी त्याची एक मैत्रिण होती तिने मला वाल्मीक कराड म्हणतो त्याप्रमाणे करा,अन्यथा स्वतःला गोळी मारुन घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला अत्याचाराच्या केसमध्ये अडकवणार असल्याची धमकी देखील दिल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले.
Back to top button