बीड

भटके विमुक्त व मुस्लिम समाजाचाही जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा

भटके विमुक्त व मुस्लिम समाजाचाही जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा

जामखेड प्रतिनिधी –मराठा आरक्षणासाठी संघर्षरत असलेले मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाला जामखेड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शविणार आहेत.
याच अनुषंगाने आज अखंड मराठा समाज, जामखेड यांच्या वतीने नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीस समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.विशेष म्हणजे, या आंदोलनाला भटके विमुक्त समाज तसेच मुस्लिम समाज या दोन्ही समाजांनी ठाम पाठिंबा दर्शविला आहे. विविध समाजघटकांचा मिळालेला हा पाठिंबा आंदोलनाला अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याचे यावेळी बोलताना मराठा समाजातील नेत्यांनी सांगितले.
धर्मा पलीकडचं बंधुत्व व मराठा आरक्षणासाठी चाललेल्या लढ्यात जामखेड तालुक्यातील एकजूट आणि सर्वसमावेशक पाठिंबा हा आगामी उपोषणाला निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

*चौकट*
गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत.त्यांचा लढा फक्त मराठ्यांसाठी नाही, तर न्यायासाठी आहे. म्हणूनच भटके विमुक्त व मुस्लिम समाजही खांद्याला खांदा लावून उभा आहे.
*नगरसेवक अमित जाधव*

Back to top button