सामाजिक जबाबदारी आणि विचारांची देवाणघेवाण यांचा संगम म्हणजे ‘सेंट ॲन्स कट्टा’

सामाजिक बांधिलकी जपत ‘सेंट ॲन्स कट्टा’ ग्रुपतर्फे शिवाजी आमटे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बीड (प्रतिनिधी)– समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, वकील, साहित्यप्रेमी आणि समाजभान असलेल्या व्यक्तींचा सहभाग असलेल्या ‘सेंट ॲन्स कट्टा’ या व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे मा. शिवाजी आमटे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या ग्रुपने केवळ संवाद आणि विचारांची देवाणघेवाण यापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतेशी निगडित उपक्रम राबवले आहेत. समाजात सकारात्मकता निर्माण करणे आणि वाचनसंस्कृती वाढविणे हा या ग्रुपचा प्रमुख उद्देश आहे.
वाढदिवस सोहळ्यावेळी ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येऊन शिवाजी आमटे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या नेतृत्वगुणांबद्दल, लोकसंपर्काबद्दल आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात लोळदगावचे सरपंच अजय नाना घोडके, प्रा. डॉ. लक्ष्मण तोंडाकुर, राजवर्धन दादा घोडके, नागेश शेठ अंधुरे, विवेक शेठ शिंदे, इंजि.अतुल शेंडगे, नितीन देवकते, अँड. सचिन कोळेकर, गणेश बनसोडे, अमर पवार सर, गोरख भडके, बिभीषण शिंदे, दिपक ढाकणे, डॉ.दहिफळे, डॉ.वरपे, अविनाश लांडे, नितीन मिटकर यांच्यासह इतर ग्रुप सदस्यांची उपस्थिती होती. सर्वांनी शिवाजी आमटे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
ग्रुपतर्फे भविष्यातही समाजहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
कार्यक्रमानंतर आनंददायी वातावरणात परस्पर संवाद, चर्चासत्र आणि मैत्रीपूर्ण गप्पांचा रंग जमला.



