बीड

दिंडी वस्तीवर 22 नागरिक अडकडे, बाळराजे पवार यांचा तहसीलदार शेळके यांना फोन , बीड जिल्हयात चिंतेचे वातावरण

दिंडी वस्तीवर 22 नागरिक अडकडे, बाळराजे पवार यांचा तहसीलदार शेळके यांना फोन , बीड जिल्हयात
चिंतेचे वातावरण
गेवराई  दि. 22 : वार्ताहर  : : गेवराई मतदारसंघात  असलेल्या नांदूर हवली व खामगावला पाण्याचा वेढा पडल्याने, जवळच असलेल्या दिंडे वस्तीवरची बावीस माणसे अडकली आहेत. एकजण झाडावर चढून बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, बीड जिल्ह्य़ात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान,  बीड जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, युवा  नेते बाळराजे पवार यांनी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना तातडीने दूरध्वनीवरून फोन करून माहिती दिली. पवार यांनी घटनास्थळावरून आढावा घेऊन, कानडी पिंपळगाव येथील बेटा जवळच्या नागरिकांची माहिती घेतली. रात्री आठ वाजता बेटा जवळ थांबलेल्या उप विभागीय अधिकारी कविता जाधव यांच्याशी चर्चा केली. या बेटावर 13 नागरिक अडकून आहेत.
    गेवराई चे युवा नेते बाळराजे पवार हे सुद्धा नांदूर हवेली गावाच्या नव्या वस्तीवर ठाण मांडून होते. बाळराजे पवार यांनी तहसीलदार शेळके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, गावात नागरीक अडकले आहेत.  तातडीने मदत करा, अशी मागणी केली. दरम्यान,
गावाला सुरक्षित बाहेर काढा, अशी मागणी होऊ लागली असून ; वस्तीवर अडकलेले लोक जीव मुठीत धरून बसलेत. त्यांना कसे बाहेर काढायचे, असा प्रश्न पडला आहे. तहसीलदार शेळके यांनी सदरील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, सोमवार ता. 22 रोजी सायंकाळपर्यंत गाव आणि वस्तीवर अडकलेल्या नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, रात्र झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बाळराजे पवार यांनी रात्री आठ वाजता दोन्ही ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना धीर दिला.
Back to top button