बीड

विजयसिंह राजे पंडित आमदार व्हावेत यासाठी केलेला नवस अर्जुन पवार यांनी बारा गाड्या ओढुन पांच कुंटल रेवडी केली वाटप

विजयसिंह राजे पंडित आमदार व्हावेत यासाठी केलेला नवस अर्जुन पवार यांनी बारा गाड्या ओढुन पांच कुंटल रेवडी केली वाटप
गेवराई प्रतिनिधी :-गेवराई तालुक्यातील नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्योतिबा देवस्थान निपाणी जवळका येथे नवसाला पावणारा देव आपला नवस पूर्ण व्हावा यासाठी गेवराई तालुक्यातून अनेक भाविक भक्त ज्योतिबाला नवस करीत असतात जयराम नाईक तांड्यातील सामाजिक कार्यकर्ते व सेवालाल सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन निंबा पवार ज्योतिबाला नवस केला श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित गेवराई तालुक्याचे आमदार व्हावेत हा नवस ज्योतिबा देवाने पूर्ण केल्यास मी पाच वर्षे बारा गाड्या वडील व पाच क्विंटल रेवडी उधळीत असा नवस केला ज्योतिबा कृपेने आणि मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाने श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाला व ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधिमंडळामध्ये गेवराईतील दिनदुबळे दलित ऊसतोड मजूर बागायतदार कष्टकरी शेतकऱ्यांचे नेतृत्व यांचा विजय झाला हा नवस ज्योतिबा ने पूर्ण केल्यामुळे श्री अर्जुन निंबा पवार यांनी पाच दिवस उपवास करून जोतिबा देवस्थानाच्या नवसाचा बारा गाड्यांचा गाडा सर्व जनतेच्या साक्षीने ओढला पुढील चार वर्ष अर्जुन पवार हे सातत्याने दरवर्षी 12 गाड्या ओढणार आहेत व श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित हेच गेवराईचे निरंतर आमदार व्हावे यासाठी जोतिबाला साकडे घातले आहे हा नवस पाचेगाव पंचक्रोशी व बारा तांड्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे सर्वच अर्जुन पवार यांचे कौतुक होत आहे यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत नवस पूर्ण करण्यात आला यावेळी सरपंच विष्णू रामभाऊ राठोड उपस्थित होते
Back to top button