📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिरात महाआरती ; जाधव दांपत्यास आरतीचा बहुमान

बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिरात महाआरती ; जाधव दांपत्यास आरतीचा बहुमान

जामखेड : शहरातील बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिरात बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दुर्गामातेची महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली. या महाआरतीचा बहुमान सामाजिक कार्यकर्त्या सौ. विजयाताई उमेश जाधव व त्यांचे पती श्री. उमेश जाधव यांना मिळाला.

बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या काळात धार्मिक विधी, महाआरती आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.महाआरतीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे सचिव प्रा. कैलास माने, विश्वस्त राजेश पवार, रवि वडे,प्रमोद बोगावत ,मौसम बोगावत,अमोल मोरे, ॲड. विकास पवार, इंजि. कपिल माने, बालाजी मोरे, राहुल मोरे,गणेश पवार, प्रकाश पवार, पिल्लु बिडकर यांच्यासह पुजारी जोशी देवा आदी भाविक उपस्थित होते.

दरम्यान, बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिराचे काम प्रगतीपथावर असून लवकरच जीर्णोद्धाराचे होणार आहे तसेच मंदिराचे काम लवकरच पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या धार्मिक आणि विकासकामात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.बाजारतळ येथील श्री दुर्गामाता मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Back to top button