ब्रेकिंगमुंबई

निवडणुकीत स्वतःचे इमान विकणारा मतदार राजा की लाचार !

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु झाली. ती आज अखेर मतदानानंतर सायंकाळी पाच वाजता शांत झाली. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते जाहीर होणाऱ्या निकालाकडे, मात्र या १५ दिवसात गावातील अनेक तरुणांच्या आणि जेष्ठ नागरिकांच्या दारूच्या आणि मटणाच्या पार्ट्या रंगल्या असणार हे कोणीच नाकारू शकत नाही.

त्यात अनेकांनी मकरसंक्रातीच्या सणात खास मतदान करण्यासाठी गावचा रस्ता पकडला होता. कारण अनेकांना येण्या-जाण्यासाठी आणि प्रत्येक मतदानासाठी खास खाकी पॅकेट पुरवण्यात आले होते. तसेच मुंबईतून गावी जाणाऱ्यांनी बोलून सुद्धा दाखविले होते.

त्यात गावाचं राजकारण काही वेगळंच असत. आता आमच्या गावात सत्ता येणाऱ्या पक्षाने कधी आमच्या विभागाचा विकास केला नाही कारण आम्ही त्यांच्या विरोधातील पॅनलला मदत करतो असे त्याचे आमच्यावर आरोप आहेत. पण एकमात्र खरं आहे की, निवडणुकीच्या जत्रेत पाहुण्यांच्या घरी खायला मिळते इतके दोन-तीन वाट्या मटण नक्कीच हाणायला भेटते.

पण ५००च्या दोन-चार नोटांसाठी आणि मटणाच्या दोन-चार फोडांसाठी आपण आपले इमान विकतो असे आपल्याला वाटत नाही का ? जर आपण हजार-दोन हजारांसाठी चुकीच्या व्यक्तीच्या हातात सत्ता दिली तर पुढचे पाच वर्ष आपल्या गावाचा विकास होईल का यांचा साधा मतदार विचार करत नाही. म्हणूनच म्हणतात “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” आता पैशावर आणि मटणाच्या जेवणावर मतदान केलेल्यांना याची चांगलीच किंमत पुढच्या पाच वर्षात फेडावी लागेल तसेच चांगली जाणीव सुद्धा होईल.

Back to top button