📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जयभवानी महाविद्यालयात विद्यार्थी समुपदेशन व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

जयभवानी महाविद्यालयात विद्यार्थी समुपदेशन व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
————-
*उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती वसीमा शेख यांच्या शुभहस्ते उद्घाटन*
———— *विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन*
————-
पाटोदा, (प्रतिनिधी)दि.१४ ऑक्टोबर : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा येथील आजिवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग व लोकप्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी समुपदेशन व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती वसीमा शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील आजिवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाचे संचालक डॉ. आश्विन राजनिकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे होते, तर प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, योग्य क्षेत्राची निवड, स्वतःच्या क्षमता व आवडीची ओळख, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती यांसाठी समुपदेशनाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि भविष्यातील करिअरविषयक निर्णय घेण्यासाठी योग्य दिशा मिळावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
उद्घाटक श्रीमती वसीमा शेख, प्रमुख पाहुणे डॉ. आश्विन राजनिकर आणि प्रमुख मार्गदर्शक श्री शिवाजीराव पंडित कला विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गेवराईचे प्राचार्य विश्वास कदम तर अध्यक्ष प्राचार्य  सदाशिव सरकटे होते प्राचार्य कदम  यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून ध्येय निश्चित करावे, तसेच उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून स्वतःचे भविष्य घडवावे, या दृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरली.
 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या समन्वयक व लोकप्रशासन विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्या श्रीमती प्रा.डॉ.कल्पना घारगे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची भूमिका व उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक देवगुडे यांनी केले, तर इंग्रजी विभागाचे प्रा. विनोद किर्दक यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना करिअरविषयक योग्य दिशा देणारा हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणुन या कार्यशाळेकडे बघितले जाते.
Back to top button