वाढदिवसावरील खर्च टाळुन पुरग्रस्तांना मदतीचा हात – दिपक मेंडके यांचा अभिनव उपक्रम

वाढदिवसावरील खर्च टाळुन पुरग्रस्तांना मदतीचा हात
– दिपक मेंडके यांचा अभिनव उपक्रम
——
माजलगाव प्रतिनिधी :मागील पंधरा दिवसांपासुन तालुका व परिसरात बरसत असलेल्या धो – धो पावसामुळे शेतक-यांच्या हाता – तोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावले आहे. या निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणुन माजी उपगनराध्यक्ष दिपक मेंडके यांनी स्वखर्चातुन मंजरथ येथे दोनशे पुरग्रस्त शेतक-यांच्या दोन वेळेच्या अन्नदानाची व्यवस्था आज दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी केली आहे.
तालुक्यातील मंजरथ येथे गोदावरी व सिंदफणा या दोन्ही नद्यांच्या संगमावर मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाल्याने गावात पाणी शिरले आहे. परिणामी गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पुरग्रस्तांचे हाल होत आहेत. याची माहिती मिळताच मंजरथ येथे जात पुरग्रस्तांच्या व्यथा जाणुन घेत त्यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत पुरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला तर पुराने बाधित झालेल्या पुरग्रस्तांची दोन वेळेची भोजनाची व्यवस्था देखिल दिपक मेंडके यांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान दिपक मेंडके यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. हनुमान कदम, संतोष म्हात्रे, बंडु गायकवाड, विनायक रत्नपारखी, दत्ता महाजन, उमकांत जाधव, श्रीकांत मेंडके, रोहिदास जाधव, संतोष वाघमारे, विशाल मराठे, मदन पांढरे, विकास जाधव, गोविंद आगे, गणेश शेटे, ओम हजारे, संदिप राउत, अजय गायकवाड, बबलु शिंदे, राजेंद्र आनंदगांवकर, संतोष वाघमारे, रामकृष्ण थोरात, सुशांत कांढरे, महादेव चिलगर, गोविंद वाघमारे, दत्ता पराड, गणेश शेवाळे, विकास कुंभकर्ण, प्रविण कुलकर्णी, शुभम सावंत, सुरज स्वामी, पवन कुंभार यांची उपस्थिती होती.
– चौकट –
माजी उपनगराध्यक्ष दिपक मेंडके यांचा दि. 26 सप्टेंबरला वाढदिवस असुन तालुक्यात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे त्यांनी वाढदिवसावर हार, तुरे आदींचा खर्च टाळत 25 पुरग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पुरग्रस्त शेतक-यांना शासन तर मदत करेलच परंतु शासनाची मदत मिळेपर्यंत उघड्यावर संसार पडलेल्या या पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न श्री. मेंडके यांनी केला आहे.



