बीड

धनादेश न वटल्या प्रकरणी दत्ता नवपुते याला आठ महिने कारावास व दोन लाख रु दंडा ची शिक्षा

धनादेश न वटल्या प्रकरणी दत्ता नवपुते याला आठ महिने कारावास व दोन लाख रु दंडा ची शिक्षा
अनदरीत धनादेश (चेक बाउंस) प्रकारनात बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांनी महत्वपूर्ण निकाल देत दत्ता रामराव नवपुते यास 8 महीने कारावास वह ₹दोन लाख दंडाची शिक्षा सुनावली.आरोपीने दि.01/03/2019 रोजी फिर्यादीच्या मालकीच्या शिवशंकर ऍग्रो इंडस्ट्रीज या दुकानातून रु. 119991/ रुपयाची सरकी पेंड उधारीवर खरेदी केली होती. फिर्यादीने 9 रु हमाली स्वतः दिली होती.व आरोपीने फिर्यादिस देने लागत असलेल्या कायदेशीर रकमे पोटी त्याचा एच.डी. एफ.सी.बँकेचा 1,20,000/रु.चा धनादेश दिला होता तो धनादेश फिर्यादीने वाटनावळी साठी टाकला असता न वाटता अपुरी रक्कम या शेऱ्यासह परत आला.फिर्यादी यांनी आरोपीस नोटीस देऊन देखील आरोपीने रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती.फिर्यादी यांनी सबळ पुराव्या द्वारे त्यांची फिर्याद मा. न्यायालयात सिद्ध केली.फर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह् धरून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांनी आरोपीस आठ महिने कारावास व नुकसान भरपाई पोटी दोन लाख रु दंडासह देण्याचे आदेश दिले.फिर्यादी तर्फे ऍड.विवेक डोके यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड राजेश जाधव,ऍड. सतीश गाडे,ऍड. सुधीर जाधव, ऍड.रुचके यांनी सहकार्य केले.
Back to top button