बीड
खळेगाव मध्ये एकाच तासांत दोन ठिकाणी घरे फोडून दोन तोळे सोन्यासह तीस हजार रुपयांची चोरी

खळेगाव मध्ये एकाच तासांत दोन ठिकाणी घरे फोडून दोन तोळे सोन्यासह तीस हजार रुपयांची चोरी
चोर झाले पसार..
फिंगर प्रिंट तज्ज्ञ व स्वान पथकाला पाचारण
कोळगाव बाळासाहेब घाडगे:- गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरांनी दि.०१ मे रोजी च्या सुमारास जबर चोरी केली. यामध्ये सोन्याचे दाग दागिने आणि रोख रकमेची चोरी करत चोर पळून गेले. यामुळे
ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून खडबळ उडाली. चकलाबा पोलिस स्टेशनचे पी एस आय पानपाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील गावाजवळ असलेल्या खडक वस्तीवर गेल्या अनेक वर्षापासून आहेर वस्ती असून येथे मोठी वस्ती आहे. या आहेर वस्तीवरील महेश प्रल्हाद आहेर व दशरथ सोमनाथ आहेर यांच्या घरी दि.०१ मे २०२५ रोजी रात्री एक ते दोन च्या सुमारास चोरी झाली असून हि घटना गुरुवारी रात्री ०१ते ०२ दरम्यान घडली. दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसांमुळे रात्री लाईट नसल्यामुळे हे घराच्या छतावर झोपत असताना गुरुवारी रात्री 1ते2 सुमारास रात्री चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातून अंदाजे दोन तोळे सोने व 25 हजार रुपये रक्कम मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये ऐवज महेश प्रल्हाद आहेर याच चोरी गेला आहे. तर दशरथ सोमनाथ आहेर यांच्या स्वयंपाकघराच्या दरवाजाची कुलूप तोडून घराची खिडकी कापून पेटीतील दागिने व काही रोख रक्कम चोरी गेली आहे. पहाटे तीन साडेतीन वाजता घरातील महिलांनी घर उघडे असल्याचे बघितल्यानंतर बाहेर पाण्याचा जार व फ्रिजमधील पाणी ठेवलेली कळशी व पेट्या अस्ताव्यस्त पडलेले पाहायला मिळाल्याने घडलेली घटना पाहिली. मग चोरी झाली समजले. महेश आहेर आणि दशरथ आहेर यांनी सकाळी चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माहिती दिली. त्यानंतर लगेच चकलांबा पोलीस स्टेशनचे पी.एस आय पानपाटील व सहकारी गायकवाड यांनी सदरील घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तपासाला वेग देत फिंगर प्रिंट तज्ज्ञ तपासणी व स्वान पथकाला बोलावून पुढील तपास स्वतः सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पानपाटील हे करीत आहेत. एकंदरीत घडलेली घटनेमुळे खळेगाव परिसरात भितीचे वातावरण झाले असून याचा लवकर तपासा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



