बीड

खर्डा चौकात लाईट खांबाला वेल्यांचा विळखा

खर्डा चौकात लाईट खांबाला वेल्यांचा विळखा

शॉर्टसर्किटचा धोका कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष!

जामखेड प्रतिनिधी – शहरातील खर्डा चौक-टेलीफोन ऑफिस रोड, मस्जिदच्या पाठीमागील परिसरात असलेल्या लाईट खांबाला वेलींनी संपूर्ण वेढा घातला आहे. या वेलींच्या अतिक्रमणामुळे खांबावर वारंवार शॉर्टसर्किट होत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याबाबत अनेकदा नगरपरिषद आणि वायरमन कर्मचाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.अशी माहिती येथील राहिवाशी नितीन टेकाळे यांनी दैनिक सुर्योदय न्यूज शी बोलताना दिली.

*शॉर्टसर्किटमुळे संभाव्य अपघातांचा धोका:*
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, या लाईट खांबावर वेलींच्या अतिक्रमणामुळे विजेच्या तारा झाकल्या गेल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारचा वेलकवटा अधिकच धोकादायक ठरू शकतो. पूर्वीही अशा परिस्थितीत शॉर्टसर्किटमुळे विजेचा पुरवठा खंडित झाला असून, मोठा अपघात टळल्याचे उदाहरणे आहेत.

*प्रशासन उदासीन?*
नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे. लाईट खांब नगरपरिषद किंवा महावितरणच्या अखत्यारीत येतो, मात्र दोघांपैकी कुणीही जबाबदारी स्वीकारत नसल्याची तक्रार आहे.

*नागरिकांची मागणी*:
या वेली तातडीने काढण्यात याव्यात, तसेच भविष्यात अशा धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी संबंधित खात्यांनी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Back to top button