पेन्शनर्स व सिनीयर सिटीझन्स आपली सेवा निवृत्तीच्या ठेवी स्टेट बँक ऑफ इंडिया बीडमध्ये सुरक्षीत ठेवून बँकेच्या योजनांचा लाभ घ्या-रिजनल मॅनेजर अमित धुळे

बीड (प्रतिनिधी):- दि.17 डिसेंबर 2025 रोजी पेन्शनर्स-डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात स्टेट बँक इंडिया शाखा राजुरीवेस बीड व पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष स्व.पांडुरंग गोरकर यांना व दिवंगत पेन्शनर्स असोसिएशनचे सदस्य व नातेवाईक यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. वित्त विभागाचे अधिकारी श्री.आडसुळ व उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.महेश बाब्रस (जिल्हा कोषागार अधिकारी,बीड), श्री.अमित धुळे (रिजनल मॅनेजर, एस.बी.आय.बीड), श्री.सौरभ बलसारा (चिफ मॅनेजर एस.बी.आय.राजुरी वेस शाखा,बीड), श्री.मुकूंद परदेशी (अपर कोषागार अधिकारी), आबासाहेब आडसुळ (जि.प. वित्त अधिकारी जि.प.बीड), डॉ.आनंद कुलकर्णी (आयुष विभाग, जिल्हा रुग्णालय बीड), डॉ.लीमकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री.इंजि.आर.व्ही.वजुरकर यांनी पेन्शनर्स व सिनीयर सिटीझन यांनी राष्ट्रीयता, सामाजिक समता व कुटूंब या घटकाशी समरस होऊन कार्यप्रवण करावे व दररोज प्राणायाम, सकाळी फिरणे, सर्वांशी संवाद साधने व आनंद राहावे व आपण आपल्या पेन्शनच्या अडीअडचणी संदर्भात संघटनेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले. श्री.सौरभ बलसारा (मुख्य व्यवस्थापक एस.बी.आय.शाखा राजुरीवेस) यांनी बँकेच्या ठेवी बाबत व विविध योजना या विषयी माहिती देवून आपल्या ठेवी बँकेत सुरक्षित राहतील अशी ग्वाही दिली. श्री.रेंदाळकर (मुख्य व्यवस्थापक डिपॉझीट) यांनी सायबर व डिजीटल आरेस्ट या बाबत कशी सावधानता बाळगावी व बँकेच्या बचत विभागाशी संबंधित माहिती दिली. श्री.महेश बाब्रस जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कोषागार कार्यालया संबंधी अडचणी असतील तर तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या प्रश्नाची सोडवणूक करुन घ्यावी अशी विनंती केली. श्री.संकेत जोशी व कृष्णा यांनी एस.बी.आय. बचती बाबत व इतर अल्प बचती विषयी तसेच इतर योजना बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आडसुळ (वित्त अधिकारी, लेखा विभाग जि.प.बीड) यांनी जिल्हा परिषद पेन्शनर्स यांनी त्यांच्या समस्या व अडचणी बाबत माहिती विषद केली व कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या प्रलंबीत मागण्यांची सोडवणूक करुन घ्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पेन्शनर्स व सिनीयर सिटीझन्स यांची जिल्हा रुग्णालय व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडीकल कॉलेज यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीरात बहुसंख्य पेन्शनर्सची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधी वाटप करण्यात आली. यासाठी डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.लिमकर, डॉ.मिना हांगे, डॉ.सुनीता जायभाये व इतर मेडीकल ऑफीस स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी 80 वर्षे पूर्ण पेन्शनर्स धारकांचा शाल,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. कोषाध्यक्ष रविंद्र केंडे, सचिव विजयकुमार सर्वज्ञ, सहसचिव डी.ए.देशपांडे, सदस्य मनोहर जोशी, प्रा.श्रीमती आशा पोहेकर, तालुकाध्यक्ष पी.व्ही.कुलकर्णी, तालुका सचिव नंदकुमार झरीकर यांच्यासह सर्वश्री आर.पी.कुलकर्णी, डी.एन.जोशी, पी.एल.कुलकर्णी, प्रा.सौ.एस.यु.कुलकर्णी, शामसुंदर पटाईत, श्रीराम कुलकर्णी, प्रेमदास वैष्णव, श्री.प्रकाश चैतन्य, सौ.विनया हसेगावकर, आर.एच. उपाध्ये,चंद्रकांत देशपांडे, सौ.मंगल जोशी, प्रदीप कुलकर्णी, श्रीरंग गोरकर, सौ.सविता जोशी, काझी मकदुम, इंजि.म्हाळातकर, श्री.घोडके, डी.एस.कुलकर्णी, सौ. प्रतिभा चैतन्य, श्री. विठ्ठल राजहंस, श्री.शहाणे, राजेश्वर चव्हाण (अंबाजोगाई), श्री.बाहेगव्हाणकर, कांबळे (केज), एस.एस.शिंदे (माजलगाव), भास्कर जोशी (गेवराई), मंजुळे (आष्टी), बाबुराव शिनगारे (धारुर), मुंडे (परळी), गोविंद वाघ, बोबडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.राम कुलकर्णी व नंदकुमार झरीकर यांनी केले. आभार प्रदर्शन विजयकुमार सर्वज्ञ यांनी केले. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



