नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.गीता पवार यांनी मतदारांना धमकावल्या

प्रकरणी अहवाल सादर करण्याच्या निवडणुक आयोगाकडून सूचना
व्हाईस सॅम्पल रिपोर्ट येताच कारवाईची शक्यता
गेवराई (प्रतिनिधी) दि. ०१ – गेवराई नगर परिषद निवडणुक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.गीता बाळराजे पवार यांनी मायक्रो ओबीसी कुटूंबातील मतदारांना जाहिररीत्या धमकावल्याचा प्रकार सिसिटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितल महेश दाभाडे यांनी याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. राज्य निवडणुक आयोगाने या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिल्या आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी व्हिडीओ मधील तपशिलाची तपासणी केली असून याबाबतचे व्हाईस सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. त्याचा रिपोर्ट येताच या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेवराई नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार सौ.गीता बाळराजे पवार यांनी निवडणुक प्रचारासाठी काढलेल्या रॅलीमध्ये दाभाडे गल्ली येथील मायक्रो ओबीसी कुटूंबातील मतदाराला दिलेल्या घरकुलाची आठवण करुन देत थेट झोडपुन काढणार असल्याचा दम दिला होता. सदरचे धमकी प्रकरण स्थानिक सिसिटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितल महेश दाभाडे यांनी याबाबतची तक्रार निवडणुक आयोगाकडे करुन कारवाईची मागणी केली होती.
राज्य निवडणुक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सादर करावा अशा सुचना आयोगाने दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी या व्हिडीओची सत्यता पडताळण्याचे काम सुरु केले असून सदर व्हिडीओ मधील आवाज भाजपा उमेदवार सौ.गीता पवार यांचाच आहे का ? याची पडताळणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी व्हाईस सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल येताच याप्रकरणी कायद्यातील तरतुदी प्रमाणे कारवाई होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
गेवराई नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांच्या जाहिर भाषणांमध्ये सुध्दा पातळी सोडून केलेली टिका मतदारांना आवडलेली दिसत नाही. पातळी सोडून केलेल्या टिकेला राष्ट्रवादीकडून विकासाच्या मुद्याने प्रतित्युतर दिले जात असल्याने शहरातील सुज्ञ आणि सुशिक्षित मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पसंती देताना दिसत आहे. एकंदरीतच गुंडगिरी संपविण्याचा मानस शहरातील मतदार व्यक्त करत आहेत.
![]()


