बीड

जामखेडमध्ये तिसऱ्या आघाडी चे भव्य रॅली ; नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जैनब वाहेद कूरेशी यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ

जामखेडमध्ये तिसऱ्या आघाडी चे भव्य रॅली ; नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जैनब वाहेद कूरेशी यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ

जामखेड – जामखेड नगरपरिषद निवडणुकीत तिसरया आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जैनब वाहेद कूरेशी व नगरसेवक उमेदवार अँड अरूण जाधव, राहूल उगले, यांच्या प्रचाराचा नारळ डॉ सुहास सुर्यवंशी, अवधुत पवार, उद्योजक सागर अंदुरे, मुन्तजर सय्यद, अँड अरूण जाधव, राहुल उगले, आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भव्य रॅली शहरातुन काढण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कूरेशी वंचितचे अँड. डॉ.अरूण जाधव, काँग्रेसचे राहुल उगले यांनी तिसरी आघाडी करून निवडणूक मैदानात उतरल्यापासून शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे.

यावेळी रॅली मोगलपुरा ,तपनेश्वर, मेनपेठ, सिद्धार्थ नगर,मिलींद नगर,जूनी गढी ,आरोळे वस्ती, कोल्हे वस्ती नूराणी काॅलनी,रमेश खाडे नगर, सदाफुले वस्ती,भाजी मंडई, कुंभारतळे शहरातील आदी तिसऱ्या आघाडीच्या रॅलीचा झंजावात दिसुन आला. यावेळी शहरातील नागरिकांचा मोठा सहभाग रॅलिमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून घराघरात जाऊन भेटी गाठी व चर्चा करत प्रचारात उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
यावेळी प्रचार रॅलीत जेष्ठ नेते अंकुश उगले, अँड.डाॅ. अरूण जाधव, राहूल उगले, डॉ दिनेश रसाळ, वसीम तांबोळी, सद्दाम शेख,मूज्जू पठाण,आवेश कूरेशी, मुज्जु आत्तार, अन्सार पठाण, राजू शेलार, हाजी अस्लम, बालाजी रसाळ, प्रमोद वाकचौरे, आय्याज सय्यद, अकील पठाण, सज्जाद पठाण, शाबीर कुरेशी, फय्याज कुरैशी, अतिक सय्यद, निहाल शेख, चितळे मामा, अनिल नेटके, रफीक तांबोळी, शहाबाज शेख, यांच्यासह महीला व पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते

Back to top button