सभापती प्रा. राम शिंदे यांची बाफना कुटुंबास सांत्वन भेट

जामखेड : शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती स्व. संपतलाल बाफना यांच्या सौभाग्यवती व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना आणि गौतम(दादा)बाफना यांच्या मातोश्री स्व. किरणबाई संपतलाल बाफना (वय ७२) यांचे २३ सप्टेंबर रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले होते.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज (२ ऑक्टोबर) रोजी जामखेड येथील बाफना परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन आपले सांत्वन व्यक्त केले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद,विजय कोठारी,संचालक राहुल बेदमुथ्था,नगरसेवक अमित चिंतामणी,भाजपा व्यापारी संघटना अध्यक्ष पिंटूशेठ बोरा,अभय बाफना,पवन राळेभात,आकाश बाफना,डॉ.अल्ताफ शेख,शिवकुमार डोंगरे, मंगेश बेदमुथ्था,मिथुन बाफना,आदी मान्यवर उपस्थित होते.



