
बाजीराव पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न
स्फुर्ती शिक्षण संस्था जांब संचलित बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांब ता.शिरूर का.येथे महाराष्र्ट शासनाच्या महावृक्षारोपण अभियान अंतर्गत ऑगस्ट 2025 मध्ये एकाच वेळी महावृक्ष लागवड अंतर्गत विद्यालयाचे प्राचार्य खाडे टी व्ही जांब गावच्या संरपच सौ राधाताई अशोक खाडे ,जालिदर दरेकर,अशोक नागरगोजे हावळे सर,राजेंद्र नागरगोजे अभिजीत खाडे,इंगळे लहू ,प्रल्हाद खाडे ,भिमराव मिसाळ,ग्रामसेवक बडे साहेब या मान्यवराच्या हस्ते बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात महावृक्ष लागवड राबवून वृक्षांची लागवड करण्यात आली. हरित महाराष्ट्र समृदध महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत हरित बीड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुध्दा वृक्षारोपण जनजागृती हा उपक्रम संपूर्ण बीड जिल्ह्यात राबविला त्याचाच एक भाग म्हणून बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने विविध प्रकारची झाडे लावून महावृक्ष अभियान यशस्वी केले यावेळी विद्यालयाचे सहशिक्षक मिसाळ सर,जामकर सर,मोरे सर,कराड सर जायभाये सर,खेडकर सर,सोनवणे सर,मस्के सर,ढास सर,भांगे सर शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांनी महावृक्ष लागवड अभियानात सहभाग नोंदविला.



