बीड

गौतमी आव्हाड व धम्मपाल आव्हाड यांचे एल.एल.बी. परीक्षेत यश; ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

गौतमी आव्हाड व धम्मपाल आव्हाड यांचे एल.एल.बी. परीक्षेत यश; ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

जवळा (ता. जामखेड) येथील मूळ रहिवासी आणि सध्या जामखेड येथे वास्तव्यास असलेले बौध्दाचार्य अशोक आव्हाड यांची कन्या गौतमी आव्हाड हिने औरंगाबाद येथून तसेच जवळा येथील धम्मपाल अनिल आव्हाड याने एल.एल.बी. पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांच्या यशाबद्दल ग्रामपंचायत जवळा आणि ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान सरपंच सुशील आव्हाड यांनी भूषवले. उपसरपंच विशाल शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौतमी ही आपल्या शिक्षणाबरोबरच सामाजिक भान जपत मोठी झाली आहे. तिचे वडील बौध्दाचार्य अशोक आव्हाड हे जामखेड येथे नोकरी करत असतानाच आंबेडकरी व धार्मिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार घडवले असून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र त्यांनी कृतीत उतरवला आहे.
बौद्धाचार्य अशोक आव्हाड सर यांनी आंबेडकरी चळवळीत, तसेच धार्मिक कार्यात आपले आयुष्य समर्पित केले आहे. त्यांनी बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या विचारसरणीचा प्रभाव आपल्या कुटुंबावर दृढपणे रोवला. त्यातूनच गौतमीचे यश घडून आले.

गौतमीने मिळवलेले हे यश तिच्या कुटुंबासह गावासाठीही अभिमानास्पद आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी गावकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, तिच्या माध्यमातून गाव व समाजाच्या प्रगतीसाठी योगदान घडो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी
मा.दशरथ हजारे गुरुजी संचालक,आदिनाथ साखरकारखाना,मा.सभापती प्रा.सुभाष आव्हाड सर,मा.विष्णू दादा शिंदे,मा.सुरेश कुंभार गुरुजी,मा.उपसरपंच गौतम कोल्हे,ग्रा.पं.सदस्य मा.प्रशांत पाटील, राहुल पाटील,किसन सरोदे, कल्याण आव्हाड,मा.ग्रा पं.सदस्य राष्ट्रपाल आव्हाड, सौ.माया आव्हाड, दादा आव्हाड, जगन्नाथ चव्हाण, अमोल हजारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button