पोलीस उपनिरीक्षक पदावर राजाभाऊ गर्जे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान
बीड प्रतिनिधी :- राजाभाऊ गर्जे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मातृभुमी प्रतिष्ठान , बीड च्या वतीने शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी बस स्थानकासमोरील वाहतूक शाखेत त्यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डॉ संजय तांदळे, बीड बचाव मंचचे नितीन जायभाये , लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, माजी नगरसेवक फारुख मनियार , वाहतूक शाखेचे सचिन क्षिरसागर, चिंतामणी शिंदे, नितीन शिंदे यांची उपस्थिती होती.