जामखेडमध्ये तथागत बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जामखेडमध्ये तथागत बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जामखेड | प्रतिनिधी:-बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जामखेड येथील बौध्दाचार्य बलभिम जावळे यांच्या निवासस्थानी असलेले तथागत बुद्ध विहार येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड यांनी त्रिशरण, पंचशील वंदना घेतली. विविध मान्यवरांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
या अभिवादन सोहळ्यास भाजप नेते मधुकर राळेभात, जेष्ठ नेते सुरेश भोसले,वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, अवधूत पवार,गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, बापूसाहेब गायकवाड, नामदेव गंगावणे, पंडित पवार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मनोज घोडेस्वार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा – अहमदनगर दक्षिण संस्कार विभागाचे प्रमुख बौध्दाचार्य बलभिम जावळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व बौद्ध अनुयायांचे आभार मानले.



