बीड

प्रसन्न सकाळ, निरोगी बालक – जामखेडच्या मराठी शाळेत योगवर्ग उत्साहात

प्रसन्न सकाळ, निरोगी बालक – जामखेडच्या मराठी शाळेत योगवर्ग उत्साहात

नियमित व्यायामाचे महत्त्व प्रा. पारखेंकडून विद्यार्थ्यांना”

मराठी शाळेत योगाच्या तालावर विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध प्रस्तुती”

जामखेड प्रतिनिधी – आज बुधवार, दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी मराठी मुलांची व मुलींची शाळा, जामखेड येथे सकाळच्या सत्रात प्रसन्न वातावरणात योग वर्ग मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष सत्रात ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि महाराष्ट्र राज्य योग समितीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब पारखे यांनी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या व आनंददायी पद्धतीने योगप्रशिक्षण दिले.

प्रा. पारखे यांनी विद्यार्थ्यांना रोज सकाळी नियमित व्यायाम व प्रार्थनेचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांची प्रात्यक्षिकांसह प्रभावी मार्गदर्शन केले. विविध प्रकारची योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली गेली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भरून गेले.

या योगसत्राला शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डिले(मुले),मुख्याध्यापक दत्तात्रय यादव(मुली), शाळा व्यवस्थापन समिती (मुले)अध्यक्ष नासीर सय्यद, उपाध्यक्ष संतोष तवटे,प्रा.डाॅ.शिवाजी राळेभात (मुली) अध्यक्ष, उपाध्यक्ष निलेश गायकवाड आदी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,
उपाध्यापिका शैलजा बडे, निशा कदम, अर्चना भोसले,अलका धाऊड,राधा डिसले, वंदना मोरे, कल्पना ससाणे, कल्पना साबळे,राणी वराडे, रेखा साळे, कल्पना मोरे ,कालिंदा म्हेत्रे, सारिका पोले, सरिता कवडे, निर्मला सिद्धेश्वर ,सुमन खेडकर ,मंजुषा कानडे, झोरे सोनाली ,प्रतिभा ढोबळे पाटील, भारती क्षिरसागर मनिषा पवार,शिरीष कदम, नितीन मोहळकर, सागर माकुडे आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button