बीड
शितलताई चाटे”लेडी सिंघम” यांचा बीड शहर बचाव च्या वतीने नागरी सत्कार..

शितलताई चाटे”लेडी सिंघम” यांचा बीड शहर बचाव च्या वतीने नागरी सत्कार..
अनेक सामाजिक संघटना, प्रतिष्ठान, राजकीय पक्षांच्या वतीने सहभाग..
बीड प्रतिनिधी:-रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष महिला प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या मुकुटामध्ये राज्यभर मानाचा तुरा रोवणाऱ्या बीडच्या कन्यारत्न ज्यांना महसूल विभागाच्या “लेडी- सिंघम” म्हणून ओळखल्या जातात, महसूल विभागाच्या वतीने ज्या नेहमीच ‘लीड’ रोलमध्ये असतात,सर्व जोखमीच्या मोहिमा लीड करतात, अशा या बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष सुपुत्रिचा नागरी सत्कार
‘बीड शहर बचाव मंचाच्या’ वतीने करण्यात आला. यामध्ये मराठवाडा शिक्षक संघ,राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, बीड जिल्हा कम्युनिस्ट पार्टी, भाजपा ओबीसी सेल,आधार व्यसनमुक्ती सेवा केंद्र, एसटी कामगार संघटना, संपादक व पत्रकार बांधव, जिल्हा वकील संघ, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी,मातृभूमी प्रतिष्ठान व शहरातील जेष्ठ मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. माननीय माननीय शितलताई चाटे यांनी केलेल्या कर्तव्यदक्ष कार्याबद्दल व त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल यांच्या वर शहरातून, जिल्ह्यातून व राज्यभरातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्याच्या महसूल विभागामध्ये प्रथमतः अमरावती महानगरपालिके मधून रुजू झाल्यानंतर,तलाठी या पदावर काही दिवस काम करत असताना त्यांनी एक आगळीवेगळी ओळख शेतकऱ्यांच्या,गोरगरीब-नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्या कामातून निर्माण केलेली आहे. तसेच जेव्हा कधीही गोरगरीब शेतकरी कुटुंबांवर नैसर्गिक व इतर संकटांचे डोंगर कोसळतात आणि त्यांच्या कार्यरत असलेल्या सर्कलच्या सज्जांमधील येणाऱ्या गावा-गावांमधील परिसरात कुठल्यातरी कारणाने त्रस्त होऊन व कंटाळून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असते तेव्हा तातडीने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन देखील नेहमीच केलेले आहे.अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना वेळोवेळी शासनाकडून आर्थिक मदत,व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पूर्ण हातभार धडपडीने व धडाडीने त्या लावत असतात. याच पार्श्वभूमीवर त्यांना चांगल्या कामाची पोच पावती म्हणून मंडलाधिकारी- निरीक्षक या पदावर त्यांच्ये प्रमोशन झाले. त्या सध्या मंडळ निरीक्षक या महत्त्वाच्या पदावर बीड महसूल विभागामध्ये कार्यरत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असताना अनेक अडी-अडचणींना त्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. काही दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या लोकांचे फोन सुद्धा येतात..’अशा प्रकारे आमचा फेरफार घ्या तशा प्रकारे आमचा फेर घ्या,एखाद्या प्रकरणाचा निकाल आमच्या माणसाच्या बाजूने द्या”.. परंतु कुठल्याही दबावाला बळी न पडता त्या प्रामाणिकपणे संविधानाच्या कायद्यानुसार, वेळोवेळी निघालेल्या जी.आर नुसार आणि नियमानुसार आपले कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडतात.मंडळ निरीक्षक म्हणून सध्या पाली सर्कल महसूल विभागामध्ये त्या आदर्श पद्धतीने कर्तव्य बजावत आहेत. महसूल विभागांमध्ये अशा आदर्श पद्धतीने कर्तव्य बजावणे ही देखील आजच्या काळात मोठी आश्चर्याची बाब ठरत आहे.पाली महसूल विभागामध्ये देखील त्यांनी मागच्या काळामध्ये तसेच सद्य वर्तमान काळामध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे.अनेक किचकट अडीअडचणी व प्रसंगांना शिताफीने हाताळण्याची कमालीची हातोटी त्यांच्यामध्ये आहे. अशा अनेक कामांमध्ये त्यांच्या सातत्याच्या त्या करत असलेल्या प्रशासकीय कर्तव्य प्रयत्नांना त्यांना यश देखील आलेले आहे. एक आदर्श मंडळ निरीक्षक म्हणून पाली सर्कल मध्ये व महसूल विभागातच सध्या चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मागच्या चार दिवसापूर्वी महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या रयत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आदर्श कर्तव्यदक्ष प्रशासकीय महिला अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कर्तव्यनिष्ठ व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मागे बीड शहर बचाव मंच नेहमीच खंबीरपणे उभा राहत आलेला आहे आणि भविष्यातही उभाच आहे बीड शहर बचाव मंचाच्या वतीने मा. शितलताई चाटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर बीड शहर बचाव मंचाच्यावतीने बीड शहरातील विविध संघटनांचा सहभाग घेऊन मा. शितलताई चाटे यांचा नागरी सत्कार त्यांच्याच कार्यालयामध्ये करण्यात आला. बीड शहरातील नामांकित बीड शहर बचाव या मंचाच्यावतीने सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी बीड शहर बचाव मंचाचे निमंत्रक तथा कार्याध्यक्ष,सर्व लोकांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी होणारे असे युवा नेते नितीनजी जायभाये व सर्व टीम या सत्कार प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत होती. तसेच याच सत्काराचे औचित्य साधून मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देखील त्यांना सलमान पत्र प्रदान करून देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या सत्कार प्रसंगी सर्वच मान्यवर उपस्थितांनी प्रशासकीय अधिकारी व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शनपर चर्चात्मक मते मांडली व शितलताईंच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये बीड शहर बचाव मंचाचे कार्याध्यक्ष श्री नितीनजी जायभाये, बीड शहर बचाव मंचाचे चे प्रमुख मार्गदर्शक तथा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष,सचिव ज्येष्ठ कॉम्रेड डी. जी. तांदळे सर, बीड जि.कम्युनिस्ट पार्टीचे सचिव भाऊराव प्रभाळे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मा.सुधीरजी देशमुख, साप्ताहिक समीकरण वार्ताचे मुख्य संपादक मा विजेंद्र सिंह डुलगच उर्फ भाईजी साहेब मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. संजय तांदळे, बाजीराव भाऊ ढाकणे, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा बीड शहर बचाव मंचाचे शहराध्यक्ष परवेज कुरैशी, उपाध्यक्ष टाटा सेठ, बीड शहर बचाव मंचाचे कायदेशीर सल्लागार व बीड जि.वकील संघाचे ॲड.अविनाश जी बारगजे, ॲड.नितीनजी वाघमारे, आम आदमी पार्टी जि.अध्यक्ष व बचाव मंचाचे सचिव अशोकराव येडे,आधार व्यसनमुक्ती सेवा केंद्राचे तेजसभाऊ घुमरे, संजय भडगळे,तलाठी किशोर लोखंडे, महसूल विभागाचे मंडल निरीक्षक महादेव जायभाये, तलाठी गायकवाड, अक्षरधाम संपादक तथा पत्रकार बालाजीभाऊ जगतकर, दैनिक न्याय टाइम्सचे पत्रकार संजय देवा कुलकर्णी, कुक्कडगावकर लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने भागवत वैद्य,माजी नगरसेवक सुनीलभाऊ महाकुंडे, भाजपा ओबीसीचे जिल्हाध्यक्ष भुषणभाऊ राठोड,सेवा नि.प्राचार्य भास्करराव मिसाळ, शहरातील आदी मान्यवर, नागरिक, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते



