बीड

श्री दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी  (मांजरसुंबा) येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी होणार

श्री दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी  (मांजरसुंबा) येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी होणार
बीड प्रतिनिधी;-श्रीक्षेत्र कपिलधार पासून जवळच असलेल्या
श्री.दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे  प.पु.ष.ब्र.श्री 108 शिवानंद शिवाचार्य  महाराज तमलुरकर यांच्या कृपाशीर्वादाने व  दत्त उपासक श्री. वैजिनाथ महाराज यांच्या  मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बालाघाट डोंगर परिसरात श्री दत्त संस्थान कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे  बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भगवान श्री शंकराला महारुद्र अभिषेक सकाळी होणार आहे. तसेच संगीत भजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संगीत भजनामध्ये संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची हजेरी राहणार आहे.  याबरोबरच या महाशिवरात्रीच्या पूर्व काळानिमित्ताने महारुद्र अभिषेक, आणि महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आहे. तरी या  सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील  भाविक भक्तांनी  घ्यावा असे संस्थांचे दत्त उपासक श्री. वैजनाथ महाराज शिंदे यांनी कळवले आहे.
Back to top button