वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळुन पिताजी सारडा नगरीत स्तुत्य उपक्रम

वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळुन पिताजी सारडा नगरीत स्तुत्य उपक्रम
अंबाजोगाई प्रतिनिधी:–वाढदिवस साजरा करण्याची दिवसेंदिवस स्पर्धा लागली असुन वाढदिवसावर खूप अनाठायी खर्च केला जात आहे.
मात्र याला अपवाद सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च टाळून केक कापणे, तोंडाला लावणे,पार्टी करणे अवाढव्य पैसा उधळण करणे याला फाटा देऊन पिताजी सारडा नगरीत स्तुत्य उपक्रमाला सुरुवात झाली.
वाढदिवस म्हणजे आपल्या जिवनात असा एक दिवस. कि ज्या दिवशी बाळ रडते आणि त्याची आई हसते म्हणजे वाढदिवस
आपल्या नगरीत आशा स्तुत्य उपक्रमाची सुरुवात आपल्या नगरीतील एक नागरिक खडे बोल सुनावणारा एक अवलिया सतत नगरीसाठी धडपड करणारा पोलिस वर्दीतील लपलेले एक प्रेमळ आणि भावनिक व्यक्तिमत्व…कायम मदत व सहकार्याची भावना असणारे…धार्मिक व सामाजिक कामात सदैव अग्रेसर असणारे… सकारात्मक ऊर्जेने भरपूर असे सर्वांचे लाड़के..प्रिय सन्माननीय *दत्तात्रय इंगळे* सर यांनी पिताजी सारडा नगरी गृहनिर्माण संस्था ला १७ बाँक्स फाईल दिल्या,तसेच आपल्या पिताजी सारडानगरीच्या वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीने चांगल्या कामाला कधीही तत्पर असणारा अवलिया, आमच्या “जिथं कमी तिथं आम्ही” याटिमचा एक होतकरु व त्यात हिरीरीने सहभाग घेणारा सदस्य , आपल्या नगरीतील रात्रगस्तचे सूचिबद्ध नियोजन तक्ता तयार करणारे नगरीचे विद्यमान सचिव श्रीमान *सचिनराज कुलकर्णी* यांनी गस्तसाठी व वाँचमणला सतत उपयोगाला येणारी वस्तू म्हणजे बँटरी भेट वस्तू म्हणून दिली तसेज आज आपल्या नगरीचे संचालक श्री *बालाजी चाफेकर* सर यांनी नागरीकांना बसण्याची सोय म्हणून एक बँन्च दिला व दुसरे नागरीक श्री.राहुलजी माणे साहेब यांनी पण बँन्च दिला तसेच प्रत्येकाने आशा ईतर खर्चाला फाटा देऊन आपल्या नगरी साठी फुल नाही फुलांची पाकळी देता आली तर निश्चित आपल्या नगरीची शोभा वाढेल व आपले नाव होईल.
केलं तर सगळं होतं फक्त मनापासून तसे ठरवावे लागते आणि आपली महत्वकांक्षा आपण जोपासायची कोण काय म्हणेल या कडे दुर्लक्ष करावे व जे जमेल जसे जमेल जितके जमेल तसे कार्यक्रम ठरवून वाढदिवस साजरा करावा व मानसिक समाधान मिळवावे, आजकाल ते फार महत्वाचे आहे आशीर्वाद हा मागून मिळतं नाही तर तो असे कर्म करून मिळवावा लागतो व त्यातून जो प्रेमाचा वर्षाव होतो तो जीवनभर पुरतो .



