📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड येथे शिवजयंत्तीनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन

जामखेड येथे शिवजयंत्तीनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी;-सालाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त

जामखेड येथे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व शंभुराजे कुस्ती संकुल व रोहित पवार मित्र मंडळ यांच्यावतीने कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.
यावेळी दिल्ली येथील पै. आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके असा कुस्तीचा सामना होणार आहे. या कुस्ती सामन्यांसाठी शिवप्रेमी व कुस्ती शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले आहे.
याबरोबरच पै. सागर मोहळकर, पै. बंटी शेळके, पै. संदीप लटके, पै. भैय्या शेळके, पै. पृथ्वीराज वणवे, पै. साहिल पाटील अशा अनेक दिग्गज पैलवानांच्या कुस्त्या जामखेडकरांना पाहावयास मिळणार आहेत. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शंभुराजे कुस्ती संकुलाचे पै.प्रतीक मुळे, पै. विशाल शिंदे, पै संजय तनपुरे, पै शुभम मगर, पै विकास तावरे, आकिब शेख, पै. सौरभ गाडे, पै पप्पू देशमुख, पै. उमेश शिंदे, पै. गणेश काळे यांच्यासह जवळपास १०० मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत. या कार्यक्रमास खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार आ. सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक निघेल. रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड या ठिकाणी जंगी कुस्त्या पार पडणार आहेत.

Back to top button