राष्ट्रवादी विद्यार्थी काँ अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष पदी यशोदीप किर्दत यांची नियुक्ती

राष्ट्रवादी विद्यार्थी काँ अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष पदी यशोदीप किर्दत यांची नियुक्ती
अंबाजोगाई प्रतिनिधी -सामाजिक कार्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात सक्रिय असलेले यशोदीप किर्दत यांच्यावर पक्षाकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील गव्हाणे साहेब यांच्या मन्यतेने व अमोल चव्हाण साहेब यांच्या हस्ते यशोदीप किर्दंत यांची राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), अंबाजोगाई तालुका कार्यध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. या निवडीचे पत्र राजेसाहेब (भाऊ)देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राजेसाहेब (भाऊ) देशमुख, ऋषिकेश गडदे विद्यार्थी प्रदेश सचिव आदींची उपस्थिती होती.



