बीड
यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे पॉलीटेक्निक प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुविधा केंद्र सुरू.

यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे पॉलीटेक्निक प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुविधा केंद्र सुरू.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पोस्ट एसएससी डिप्लोमा (पॉलीटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे.
प्राचार्य डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “तांत्रिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. पॉलीटेक्निक शिक्षण हे उद्योग क्षेत्राशी निगडित कौशल्य विकसित करणारे शिक्षण असून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शाखेची निवड करावी. यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.”
प्रवेश प्रक्रियेनुसार ऑनलाईन नोंदणी, अर्ज भरणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत २० मे २०२६ ते २२ जून २०२६ पर्यंत राहणार आहे. याच कालावधीत अर्ज पडताळणी व निश्चिती प्रक्रिया देखील होणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी २४ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून गुणवत्ता यादीवरील हरकती व तक्रारी २५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत नोंदविता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी ०२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड यांचा सुविधा क्रमांक- २१८२ असा असून प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक श्री. उबाळे एल.एच. (मो. ८८८८०८१३८५) तसेच श्री. वरोडे ए.ए. (मो. ९४२१३३५११५) यांच्याशी संपर्क साधावा.



