बीड
बीडमध्ये जमियतुल कुरैश सह मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बीडमध्ये जमियतुल कुरैश सह मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पोलिस कारवाईची चौकशी करून
स्वयंघोषित गोरक्षकांवर गुन्हे दाखल करा
शेख मुजीब,मोईन मास्टर, फारुक पटेल,खुर्शीद आलम तावरे यांची मागणी
बीड ( प्रतिनिधी ) बीड शहरातील मोमीनपूरा भागात पोलिसांचे संरक्षण घेऊन स्वयंघोषित गोरक्षकांनी ज्या पद्धतीने कुलपं तोडली, घरात घुसले आणि दहशत निर्माण केली हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारा आहे. याप्रकरणी त्या दिवशी झालेली पोलीस कारवाईची चौकशी करून संबंधित स्वयंघोषित गोरक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी ऑल इंडिया जमियतुल कुरैश यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब, जेष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, गटनेते फारुक पटेल आणि हिंदू – मुस्लिम सलोखा वाहक भागवत तावरे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
बीड येथे ऑल इंडिया जमियतुल कुरैश संघटनेसह मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी शेख मुजिब. गटनेते फारुख पटेल, गटनेते खुर्शीद आलम,भागवत तावरे, नगरसेवक मोईन मास्टर, नगरसेवक सादेख जमा, नगरसेवक जैतूला खान, नगरसेवक शेख रोहिल, नगरसेवक मसूद खान, नगरसेवक मोमीन मसी, नगरसेवक इलियास इनामदार, नगरसेवक वाजेद कुरेशी नगरसेवक शेख रईस, सभापती जकी सौदागर, नगरसेवक अफसर भाई, नगरसेवक शेख बिलाल, नगरसेवक अयुब खान, नगरसेवक शेख बब्बू,
नगरसेवक खय्युम इनामदार, माजी नगरसेवक शेख मतीन, बरकत पठाण,सत्तार कुरेशी, फाय्याज कुरेशी,शाजमा खान सय्यद जुल्फेखार अली, सय्यद खाजा, वासिम बागवान, नविद इनामदार,इमरान जागीरदार,शाहेद कुरेशी नादीर कुरेसी रफिक कुरेशी, खमर कुरेशी हमीद कुरेशी, नदीर कुरेशी, माजेद कुरेशी, मोबीन शेठ आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ बीड पोलीसांनी मात्र दि.11मे 2026 मध्यरात्री मोमीनपुरा भागात झालेल्या कारवाईत खाजगी तथा कथीत गोरक्षकांना सहभागी करून घेतले. पोलीसां सोबतच त्या ठिकाणी गोरक्षक पोहचले होते, त्यांनी अनेक ठिकाणी दरवाज्याची कुलुपं तोडली, घरात घुसले, दाबदडप केली. या प्रकारामुळे संबंधित कुरेशी समाज व त्या भागात राहणारे अन्य कुटूंबातील महिला व लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याठिकाणी महिला, लहान मुले असतांनाही गोरक्षक मात्र त्यांच्या धुंदीत होते. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याचे व्हिडीओ देखील तयार करून ते सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. सदरील प्रकार अतिशय गंभीर असून सोशल मिडियावर हे व्हिडीओ पाहूण अनेकांच्या मनात पोलीस आणि गोरक्षकांविषयी प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. सदरील व्हिडीओ चीड आणणारे असून अशा प्रकारामुळे बीड मधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. सध्या देखील हे व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहेत
या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, कारवाईचे व्हिडीओ फुटेज मागवून घ्यावे आणि तथाकथीत गोरक्षकांवर कारवाई करून त्यांना कारवाईत सहभागी करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. यामध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याला आणि त्यास अनुसरुन होणाऱ्या कारवाईला आमचा विरोध नाही मात्र या कायद्याच्या आडुन तथा कथीत गोरक्षकांना सहभागी करुन पोलीसांनी केलेल्या बेकायदेशिर कार्यवाहीवर आक्षेप आहे. त्या अनुशंगाने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन सबंधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
चौकट
आ सना मलिक आणि
मुजीब यांच्यात चर्चा
कुरेशी समाजाच्या प्रश्नावर अजित दादांनी घेतलेली भूमिका सर्वांना ठाऊक आहे सदरील भूमिका आ. सना मलिक यांनी घेऊन दिलेली यावेळी देखील बीड प्रकरणी भूमिका घ्यावी अशी विनंती शेख मुजीब यांनी आ सना मलिक यांना केली .
चौकट
शब्बीर मामू पेक्षा मोठा
गोरक्षक कोण -भागवत तावरे
शिरूर येथील पदमश्री शब्बीर मामू सारखा गोरक्षक कोण आहे असा सवाल भागवत तावरे यांनी विचारला .धर्मावरून तेढ निर्माण करणारे गुंड सलोख्याची कत्तल करणार असतील तर आम्ही ते होऊ देणार नसल्याचे भागवत तावरे यांनी परखड पणे मांडले.



