जामखेडमध्ये श्री सद्गुरू ट्रेडर्स चे उद्घाटन उत्साहात

जामखेडमध्ये श्री सद्गुरू ट्रेडर्स चे उद्घाटन उत्साहात
जामखेड प्रतिनिधी :
शहरातील प्रसिद्ध व्यापारी निलेशकुमार गोकुळदास उर्फ पिंटूशेठ बोरा तसेच श्री अरिहंत निलेशकुमार बोरा यांच्या श्री सद्गुरू ट्रेडर्स या नवीन दुकानाचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी शहरातील व्यापारी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पिंटूशेठ बोरा यांच्या व्यवसायिक वाटचालीचे कौतुक करत, नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्थानिक पातळीवर नवे उद्योग-व्यवसाय उभे राहणे ही आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि शहराच्या विकासालाही हातभार लागतो.
शहरात आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने हा व्यवसाय उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



