बीड

सुवर्णप्राशनातून बाल आरोग्याला बळ : दिलीप गुगळे जामखेडमध्ये सुवर्णप्राशन संस्कार शिबिर संपन्न

सुवर्णप्राशनातून बाल आरोग्याला बळ : दिलीप गुगळे

जामखेडमध्ये सुवर्णप्राशन संस्कार शिबिर संपन्न

जामखेड (प्रतिनिधी) : परम पूज्य आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या निर्वाण तिथीनिमित्त जामखेड येथे सुवर्णप्राशन संस्कार शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी शांतिराज अतिथी निवास, मेन रोड, जामखेड येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरासाठी विशेष उपस्थित म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाफना, उद्योगपती शांतिलाल गुगळे, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना,लखमीचंद बाफना,रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण, शिवसेना युवा नेते आकाश बाफना,अभय बाफना,उद्योजक प्रकाश लोढा ,जय श्रावक संघाचे ट्रस्टी मंगेश बेदमुथ्था ,संजय गांधी , जितेंद्र बोरा, विनोद बेदमुथा, डॉ.योगेश मेहेर ,अशोक बाफना, रविंद्र छाजेड,रोशन बाफना,श्रेयश बाफना,अनिल बाफना आदी मान्यवर तसेच बाफना परिवारातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे बोलताना म्हणाले,सुवर्णप्राशन शिबिर हे बालकांच्या आरोग्य व संस्कारासाठी महत्त्वपूर्ण आहे.भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवू.आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत आपल्या बालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे.सुवर्णप्राशनातून बाल आरोग्याला बळ मिळते.आयुर्वेदाच्या परंपरेतून आलेला सुवर्णप्राशन संस्कार हा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतो.

सुवर्णप्राशन शिबिरासारखे उपक्रम बालकांच्या आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त आहेत. पुढील काळात डॉ. लाभश्री श्रेयश बाफना यांनी असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवून जामखेडकरांची सेवा करावी, असे मत आकाश बाफना यांनी व्यक्त केले.

या शिबिरात आयुर्वेद तज्ञ डॉ. लाभश्री श्रेयश बाफना (B.A.M.S.) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ महिने ते १२ वर्षे वयोगटातील बालकांना सुवर्णप्राशन संस्कार देण्यात आला.१.५ वर्षांच्या सुवर्णप्राशन संस्काराचा अनुभव असून, शिबिरात पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या औषधांचा वापर करण्यात आला.

सुवर्णप्राशनामुळे बालकांची बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते, एकाग्रता वाढते तसेच शारीरिक व मानसिक विकासास चालना मिळते. त्वचा, दृष्टी आणि श्रवणशक्तीसाठीही हा संस्कार उपयुक्त ठरतो, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन श्री वर्धमान जैन श्रावक संघ, जामखेड व बाफना परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. जामखेड परिसरातील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या बालकांसाठी या उपक्रमाचा लाभ घेतला.

Back to top button