बीड
कासेगाव (ता वाळवा) येथे आज (गुरुवार) ऐतिहासिक भव्य जयंत हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा रंगणार थरार

कासेगाव (ता वाळवा) येथे आज (गुरुवार) ऐतिहासिक भव्य जयंत हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा रंगणार थरार
*ईश्वरपूर दि. (प्रतिनिधी)*
*इकबाल पीरजादे*
कासेगाव (ता वाळवा) येथे आज (गुरुवार) ऐतिहासिक भव्य जयंत हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्व.शरद लाहिगडे (आण्णा) फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून ही ऐतिहासिक बैलगाडा शर्यत संपन्न होत आहे. कासेगाव येथे आशियाई महामार्गाच्या पश्चिम बाजूला या मैदाना ची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेतकऱ्यां चा पोसिंदा जगला पाहिजे,या भावनेने या शर्यती घेतल्या जात आहेत.
प्रथम क्रमांकासाठी ५ लाख ६ हजार२६५ रुपये रोख रक्कम व कायमशिल्ड.स्व.शरद लाहिगडे (आण्णा) फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे कडून व्दितीय क्रमांकासाठी बक्षीस ३ लाख ६ हजार २६५रोख रक्कम व कायमशिल्ड सचिन बेडक्या इचलकरंजी,यांचेकडून,तृतीय क्रमांक बक्षीस २ लाख,६हजार २६५ रोख रक्कम व कायमशिल्ड खंडेराव जाधव उपनगराध्यक्ष ईश्वरपूर यांचेकडून,चतुर्थ क्रमांक बक्षीस १ लाख, ६ हजार २६५ रोख रक्कम व कायमशिल्ड डॉ विक्रम आडके,दिनकर लाहिगडे,यश इलेक्ट्रिकल्स, विकास लाहिगडे यांचेकडून, पाचवा क्रमांक बक्षीस ६२ हजार २६५ रोख रक्कम व कायमशिल्ड राहुल देवकर उद्योजक कासेगाव,दिलीप मोरे (इंजिनिअर) साखराळे आणि अमोल ठोंबरे यांचेकडून,सहावा क्रमांक बक्षीस २६ हजार २६५ रोख रक्कम व कायमशिल्ड एपिक यार्न्स कंपनी सर्व स्टाफ यांचेकडून,सातवा क्रमांक बक्षीस,२६ हजार २६५ रोख रक्कम व कायम शिल्ड शाहीद चौधरी यांचेकडून. तसेच अभिनय राजाराम उबाळे (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर) इस्लामपूर यांचेकडून सर्व कायमशिल्ड देण्यात येणार आहेत. सेमी फायनलमध्ये येणाऱ्या दोन नंबरसाठी रुपये ६,२६५ रोख रक्कम अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.प्रत्येक बैलगाडीसाठी नोंदणी फी ३ हजार रुपये आहे.ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.
महिला प्रेक्षकांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व निकाल ड्रोन व स्क्रीनच्या सहाय्याने दिले जातील. प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी ८ पासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असून प्रकाश व्यवस्था केली आहे. ऑनलाइन नोंदी करिता व पेमेंटसाठी दफ कोड देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांच्या हस्ते आणि माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, जि.प.सदस्य विराज नाईक, पं.स.सदस्या सुप्रिया पाटील, अनुपमा अतुल लाहिगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शर्यतीचा शुभारंभ होणार आहे. तर सायंकाळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते, माजी मंत्री आ.विश्वजित कदम,आ.डॉ.अतुल भोसले, माजी आ.मानसिंग नाईक, विक्रम सावंत,युवा नेते प्रतिकदादा पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत.विकास लाहिगडे,विक्रम गावडे मकरंद माने,सोमनाथ लाहिगडे,अक्षय लाहिगडे विकास पाटील (भैया),माळशिद शेंडगे,संभाजी पाटील,जितेंद्र पाटील,काका पाटील,शरद शिनगारे,योगेश मोटे,संजय लाहिगडे,अभि दंडवते अमोल ठोंबरे, दिग्विजय बडेकर,अभि आडके,सोमनाथ जंगम,सागर कांबळे,सौरभ शहा,अविनाश देसाई,अभिनय उबाळे,कनया बोडरे,सुशांत माने,उत्तम गेजगे, अनिकेत शिरटेकर,सुरज देशमुख विनोद लाहिगडे,प्रवीण लाहिगडे,राहुल लाहिगडे,मोन्या मुल्ला,बाळू म्हासोलीकर, तसेच शरद लाहिगडे (आण्णा) फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्पर्धेचे संयोजन करत आहेत.
*खास हेलिकॉप्टर सफरची व्यवस्था ll*
जागतिक महिला दिनानिमित्त ही बैलगाडा शर्यत पहाण्यास येणाऱ्या सर्व महिलापैकी ६ भाग्यवान महिला,तसेच सर्व विजेत्यापैकी ६ बैलगाडा चालक- मालक प्रतिनिधी यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून मोफत हेलिकॉप्टर सफर घडविली जाणार आहे. हे या वर्षीचे खास आकर्षण ठरले आहे.



