बीड

देशातील मुली,महिलांवरील होणारे अन्याय,अत्याचार तसेच वाढते मुलींचे अपहरण थांबले तरच अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरे करण्याचे सार्थक होईल- अरुणाताई निसर्गन

देशातील मुली,महिलांवरील होणारे अन्याय,अत्याचार तसेच वाढते मुलींचे अपहरण थांबले तरच अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरे करण्याचे सार्थक होईल- अरुणाताई निसर्गन

बीड (प्रतिनिधी):- भारतीय बौध्द महासभा महिला विभागाच्या विद्यमाने अजिंठा बुध्द विहार, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी येथे दि.8 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वा. आयु.नेहाताई पारवे वार्ड शाखा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमांना  आणि माता जिजाऊ, माता सावित्रीबाई आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार, धुपबत्ती प्रज्वलित करुन वंदना घेवून कार्यक्रमास सुरुवात झाली.
मायादेवी पारवे यांच्या प्रास्ताविकानंतर जिल्हा उपाध्यक्षा कांताताई जाधव, पद्मीनताई गायकवाड केंद्रीय शिक्षिका गडगे ताई, मंदा सोनवणे, ज्योत्स्ना साळवे, सुश्मीताताई डोंगरे, सरस्वतीताई जाधव, शहराध्यक्ष मंदाकिनी मस्के यांनी 8 मार्च महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शनात अरुणाताई निसर्गन म्हणाल्या की, महिला प्रमाणेच पुरुष कुठल्याच ठिकाणी धाडस करत नाहीत, किंवा धैर्य दाखवत नाहीत. परंतु महिलांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेला नाही. चुल आणि मुल या भावनेनेच महिलांना ओळखले जाते. आज अनेक महिलांनी सर्वोच्च प्रगतीचे शिखर गाठलेले आहे. अनेक महिलांनी धैर्याने मोठ-मोठ्या पदावर कर्तव्य करुन महिलांचे नेतृत्व सिध्द करुन दाखवले आहे. सर्वात प्रथम भगवान बुध्दांनी महिलांना समानतेची संधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाचा चोळी, बांगडी करुन मातेच्या स्वरुपात पाहून आदर,सत्कार केला करीता आपण सर्वांनी महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घेवून महिलांना समानतेची वागणूक देणे अत्यंत गरजेचे आहे. दररोज वर्तमानपत्रामध्ये महिला,मुलींना, मुलांना पळवण्याची बातमी आपण वाचतो. दि.9 मार्च 2026 ची बातमी आहे, सरकारच्या अधिकृत माहितीवरुन महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या 31 जानेवारी 2026 या कालावधीत 35 हजार 377 मुले,मुली बेपत्ता झाल्याचे चित्र आपल्या समोर आलेले आहे. अशी संवेदनाहीन वृत्ती थांबवण्यासाठी समाजाने पुढे येण्याची आवश्यकता अरुणाताई निसर्गन यांनी प्रतिपादीत केली. तसेच शनिवार दि.14 मार्च दुपारी ठिक 12.30 वाजता वडवणी शहरामध्ये संस्थेचे प्रमुख डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार्‍या धम्म परिषदेस जिल्ह्यातील सर्व महिला भगिनी, बांधवांना उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास सविता भालेराव, अनिता जाधव, अनुश्री पारवे, त्रिशला राऊत, चांदमारे ताई, दळवी ताई इत्यादी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. शेवटी अनिता जाधव यांच्या आभार प्रदर्शनानंतर सरणात्तय घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button