बीड
स्व.अमोल भैया गलधर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

स्व.अमोल भैया गलधर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
“अन्नदान व रक्तदान हेच श्रेष्ठ दान” – स्वप्नील गलधर
बीड, दि. ८ (प्रतिनिधी) – स्वर्गीय अमोल भैय्या गलधर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड येथील शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन स्वप्नील भय्या गलधर यांनी स्वतः रक्तदान करत अमोल भय्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अमोल गलधर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. अमोल भय्या हे आयुष्यभर गोरगरीब, अनाथ व गरजू लोकांच्या मदतीसाठी तत्पर असत. त्यांचा हाच सेवाभावाचा वारसा पुढे नेत स्वप्नील गलधर सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अन्नदानाबरोबरच रक्तदानही तितकेच महत्त्वाचे असून समाजातील प्रत्येकाने या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वप्नील गलधर यांच्या पुढाकाराने मित्रपरिवार, डॉक्टर, वकील, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. शिबिरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी adv मंगेश भाऊ पोकळे,स्वप्नील भैया गलधर, सतीश शेळके,नगरसेवक मुन्ना वाघमारे,इंजि. सुहास तांबारे साहेब,केशव तावरे साहेब,दुर्गदास हुंबे,इंजि. रुपेश शिंदे,रमेश इंगोले, महेश चव्हाण,राहुल टेकाळे,बप्पा बाबर,adv अभिजित गलधर,ज्ञानेश पडघन, गिरीश गलधर,सागर वरपे,स्वप्निल शेळके,अक्षय जगताप,उमेश कोकाटे प्रीतम दुधाळ, सौरभ निंबाळकर, अशोक कदम, शाम पाळणे,शुभम कुदांडे,अशोक ढोले व सर्व उपस्थित स्व अमोल भैया वरती प्रेम करणारे सर्व सहकारी व स्व. अमोल गलधर युवा मंचाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



