
तुकाराम मुंढेंची यांची बदली रद्द करा- डॉ. संजय तांदळे
बीड (प्रतिनिधी) : राज्यातील धडाडीचे,क्रियाशील, कर्तव्यदक्ष व दबंग भारतीय प्रशासन सेवेतील आय.ए.एस. अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवारी सायंकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदली करण्यात आली आहे. 20 वर्षांच्या सेवेत मुंडेंची 23 साव्यांदा असंघटित कामगार आयुक्त पदावरून दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्री आणि राजकीय नेते कधीही एका जागेवर राहू देत नाही नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना 20 वर्षांमध्ये 23 वेळा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडेंची आतापर्यंत झालेली बदली आणि खाती (२००५-२०२५ पर्यंत) १. ऑगस्ट २००५ -प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर २. सप्टेंबर २००७ -उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग३. जानेवारी २००८ सीईओ, जिल्हा परिषद, नागपूर ४. मार्च २००९ आयुक्त, आदिवासी
विभाग५. जुलै २००९ सीईओ, वाशिम६. जून २०१० – सीईओ, कल्याण७. जून २०११ जिल्हाधिकारी, जालना८. सप्टेंबर २०१२ – सहा आयुक्त विक्रीकर, मुंबई९. नोव्हेंबर २०१४ जिल्हाधिकारी, सोलापूर १०. मे २०१६ आयुक्त, नवी मुंबई११. मार्च २०१७ -मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे १२. फेब्रुवारी २०१८ आयुक्त, नाशिक महापालिका १३. सहसचिव, नियोजन १४. डिसेंबर अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई १५. आयुक्त, नागपूर महापालिका१६. नोव्हेंबर २०१८ २०१८ प्रकल्प जानेवारी २०२० ऑगस्ट २०२० सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई १७. जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत १८. सप्टेंबर २०२२ -आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (१९. नोव्हेंबर २०२२ अचानक बदली, प्रतीक्षेत ठेवण्यात आले (चा कार्यकाल फक्त २ महिने) २०. एप्रिल २०२३ सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग२१. जून २, २०२३ सचिव, मराठी भाषा विभाग२२. जुलै २०२३ कृषी आणि पशुसंवर्धन विभाग सचिव म्हणून बदली पुढे चालू राहिली. २३. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंडे यांची २३ व्यांदा बदली करण्यात आली असून त्यांना आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी किंवा सध्या झालेल्या नियुक्तीवर किमान तीन वर्ष काम करण्याची यांना संधी द्यावी अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजय तांदळे ,सुदाम कोळेकर, डॉ. लक्ष्मण पवळ ,बाजीराव ढाकणे यांनी दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार उगलमुगले मॅडम यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.



