बीड

दिल्लीत केजरीवाल… तर जामखेड येथे आम आदमी पार्टीचे बजरंग सरडे!

वार्ड ७ मध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार; तळमळीच्या कार्यकर्त्याला मोठी संधी
जामखेड | प्रतिनिधी :-जामखेड नगर परिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीने प्रभाग क्रमांक ७ मधून बजरंग सरडे यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले असून पक्षाच्या स्थापनेपासून  सतत तळमळीने, संघर्षातून आणि लोकांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव म्हणून सरडेंची निवड झाली आहे.
उमेदवारी जाहीर होताच प्रभाग ७ मध्ये उत्साह निर्माण दिसून येत आहे.स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, सर्वसामान्यांच्या  समस्या सोडवणारे आणि पक्षाच्या तत्त्वज्ञानावर ठाम राहणारे बजरंग सरडे हे विश्वासू आणि परिचित चेहरा आहेत.
यावेळी बोलताना सरडे यांनी सांगितले,आम आदमी पार्टीने माझ्यावर ठेवलेला विश्वास हा विकासाची दिशा देण्याची जबाबदारी आहे. प्रभाग क्रमांक ७ च्या नागरिकांनी मला साथ दिल्यास मी प्रभागातील मूळ समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे आणि उत्तरदायित्वाने काम करीन.
प्रभागातील मतदार राजा ने साथ द्या… सेवेसाठी संधी द्या… आम आदमी पार्टीचे बजरंग सरडे निवडून द्या! हा नारा जोरदार घुमत आहे. प्रचारात मिळालेला प्रतिसाद पाहता जामखेडच्या गल्लीबोळात आम आदमी पार्टीची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Back to top button