बीड

भाजपा शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित

भाजपा शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित

परळी (परळी) स्व. सौ. वंदना पारसेवार सामाजिक प्रतिष्ठान परळी वै. व व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री नागनाथजी पारसेवार यांच्या 61 एकसष्ठी प्रित्यर्थ  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परळीतील कर्तत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ब्रिजलालजी मुंदडा व प्रमुख पाहुणे म्हणून आर्यवैश्य समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री विकासरावजी डूबे, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे 61 पूर्ती सोहळ्याची उत्सव मूर्ती आदरणीय श्री नागनाथजी पारसेवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश कौलवार, पतंजली प्रमुख सरलाभाभी उपाध्याय हे उपस्थित होते.
सामाजिक,राजकिय कार्यात सक्रिय राहुन कार्य करत असलेल्या भाजपाच्या शहरअध्यक्ष सौ.उमामाताई समशेट्टे या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.दोन वेळा नगरसेविका म्हणून कार्य केलेले आहे. बीड जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या सदस्या म्हणून तसेच वीरशैव महासभेच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांच्या पायावर उभे केले आहे.महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा,महिला सक्षम व्हाव्यात म्हणून अनेक कार्यशाळा घेतल्या.त्यांच्या या कार्याची स्व.सौ.वंदना नागनाथ पारसेवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने व मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त दि.८ मार्च रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचा शहराध्यक्ष सौ .उमाताई समशेट्टी यांनी स्व.वंदनाताई यांच्या कार्याची आठवण करून दिली. तसेच श्री नागनाथजी पारसेवार यांचा विविध संस्थांच्या वतीने 61 वा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
पंचम ज्योतिर्लिंग महाप्रभू वैद्यनाथ नगरी श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे येणाऱ्या भाविकांना त्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी रेल्वेची वेळ समजण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने रेल्वे वेळापत्रकाचे व्यास पिठावरील मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. रेल्वे वेळापत्रक गणपती मंदिराच्या भिंतीवर लावण्यात आले.
यावेळी परळी नगरीच्या नगराध्यक्ष सौ पद्मश्री धर्माधिकारी, सौ. सविता देवशटवार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास  जिजामाता गार्डन सदस्य वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन विकासराव डुबे, अभयकुमार ठक्कर, चैनसुख जाजू, सुभाष तोतला, बंडूशेठ गरुड, रेपे साहेब, गुलाबराव शेटे, सोळंके सर, काकांनी सर, चंद्रकांत मुंडे, आंबेकर साहेब, वंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश कौलवार, लक्ष्मीकांत चौलवार, विनोद कौलवार, प्रकाश चिद्रेवार, विवेक पारसेवार, सुनील गडम, सरला उपाध्याय, अर्चना रुद्रावार, छाया बुरांडे, सुजाता गडम, शारदा धुमाळ, नंदा पारसेवार, शालिनी बोधे, आधी उपस्थित होते.

Back to top button